शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डोअर टू डोअर सर्व्हेत ३,००९ संशयित कुष्ठरूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:36 IST

कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या १,२९२ पथकांकडून जिल्ह्यात पंधरा दिवस मोहीम

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेच्या आठ दिवसात बुधवारपर्यंत ३,००९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील काहींची तपासणी केली असता ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या गतवर्षीच्या सर्व्हेच्या तुलनेत कमी असली तरी कुष्ठरुग्णाच्या प्रमाणाचे शुन्य गाठने सध्या तरी शक्य नसल्याचे दिसत आहे.शासनाच्यावतीने विविध योजना राबवून कुष्ठरुग्णांचे प्रमाण दिलेल्या मानकाच्या तुलनेत आणण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आरोग्य संस्थेने दिलेल्या मानकानुसार १० हजार रुग्णांमागे १ पेक्षा कमी रुग्ण असणे अपेक्षित आहे. मात्र वर्धेत तसे नसल्याचे दिसते. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचे प्रमाण झालेल्या सर्व्हेनुसार १.४० एवढे असल्याचे दिसून आले आहे. असलेले प्रमाण कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने डोअर टू डोअर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेकरिता १ हजार २९२ चमू कार्यरत आहेत. या चमूत एक महिला आणि एका पुरूष कर्मचाºयाचा समावेश आहेत. या चमूने आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांची तपासणी केली आहे. संशयित असलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे सामोर आले. या रुग्णांवर कुष्ठरोग विभागाकडून औषधोपचार करण्यात येत आहे. ही मोहीम २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आढळले नऊ रूग्ण सांसर्गिकराबविण्यात आलेल्या सर्व्हेत ३५ नवे रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९ जणांना असलेला कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचे दिसून आले आहे. आणखी पाच दिवसाचा कालावधी बाकी आहे, यात किती रुग्ण आढळतात यावर जिल्ह्याची टक्केवारी ठरणार आहे.१९ हजार ८०५ घरांवर ‘एक्स’चे निशाणया मोहिमेदरम्यान बंद असलेल्या घरांवर ‘एक्स’चे निशाण करण्यात आली. या घरांना पुन्हा भेट देत १३ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.२,५८४ कर्मचारी देणार ३.०६ लाख घरांना भेटीशासनाच्या आदेशानुसार होणाºया या सर्व्हेत पंधरा दिवसात ३ लाख ६ हजार १९० घरांना भेटी देण्यात येणार आहे. याकरिता २ हजार ५८४ कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांना भेटी देण्यात आल्या.जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून अनेक गैरसमज दूर होऊन नागरिकांत जनजागृती होत असून नागरिक स्वत: तपासणी करीत आहे.- के.झेड. राठोड, सहाय्यक संचालक,कुष्ठरोग, वर्धा