शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट शहरात नशेखोरांमध्ये फेमस होतेय 'कुत्ता गोळी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:16 IST

Wardha New औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. मात्र, आता कुत्ता गोळीची क्रेझ हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्दे तरुणपिढी व्यसनाच्या गर्तेतबेकायदा गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शासनाने प्रतिबंध घातलेल्या गोळ्यांची हिंगणघाट शहरात बेकायदा विक्री सुरू असून या औषधांचा वापर तरुणपिढी नशेसाठी करीत असल्याची माहिती आहे. हिंगणघाट शहरातील काही विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारुन या औषधांची विक्री करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे सारं घडत असतानाही कारवाई मात्र, कुठेच दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. खोकल्याची औषधे, झोपेची औषधे, यासाठी वापरली जातात. सराईत गुन्हेगारांबरोबरच महाविद्यालयीन विद्याथीर्ही या नशेचे शिकार झाले आहेत. मात्र, आता कुत्ता गोळीची क्रेझ हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही गोळी अधिक चर्चेत आली असून आता तिचे दुष्परिणामही शहरातील गुन्हेगारी जगतात दिसून येत आहे.काय आहे कुत्ता गोळी?औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापर करण्यास सुरुवात केली. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते.पोलिसांचे खबरे अलर्टशहरात प्रतिबंधित औषधांचा वापर नशेसाठी सुरू असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनाही असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी जात पाहणी केली. इतकेच नव्हेतर औषधी दुकानांमध्येही जात याबाबतची विचारपूस केली. विक्री होणा?्या या गोळ्या नेमक्या येतात तरी कुठून याबाबतचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात खबरे देखील कामाला लावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :medicineऔषधं