शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१२ महिन्यांतील स्थिती : अनेकांना गमवावा लागला जीव

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ११९ जणांना चावा घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होते. हा शासकीय आकडा समस्येचे गांभीर्य दर्शविणारा आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा हे मोकाट श्वान पाठलाग करतात. यामुळे अपघात होऊन कित्येकांना अपंगत्वही आले आहे. सोबतच महामार्गावरही भटके श्वान आडवे जात असल्याने गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यास, त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासन अयशस्वी ठरले आहे.एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांत ७ हजार ११९ जणांना श्वानदंश झाला. यातील अनेकांना जीवही गमवावा लागला. आर्वी उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशाची ६४२ प्रकरणे दाखल झाली. भिडी ग्रामीण रुग्णालय २४०, पुलगाव ग्रामीण रुग्णालय-६५९, वडनेर ग्रामीण रुग्णालय १३३, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट- ७९४, कारंजा ग्रामीण रुग्णालय ६०३, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय-३६६, सेलू ग्रामीण रुग्णालय ९१४ तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २ हजार ७६८ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. ही संपूर्ण आकडेवारी शासकीय आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेतात. त्यामुळे श्वानदंशाचा आकडा ३० हजारांच्या जवळपास असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.बळावताहेत कोरड्या खोकल्याचे आजारजिल्ह्यात गत काही वर्षांपासून श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. श्वानांच्या संख्यावाढीमुळे कोरड्या खोकल्यासह इतर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.जन्मदर नियंत्रणाला यंत्रणांची बगलनगरपालिका, ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींकडून आकारल्या जाणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. संबंधित यंत्रणेकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरच जनावरे पाळता येतात. तसा नियम आहे. मात्र, या नियमाला गोपालक, नागरिकांकडून सर्रास पायदळी तुडविले जाते. याकडे यंत्रणेकडूनही सपशेल दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता करापोटी रक्कम मात्र वसूल केली जाते. श्वानांच्या जन्मदर नियंत्रणाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे.श्वान व इतर मोकाट जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. यातूनच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नागरी वस्तीत जनावरांचा गोठाही बांधता येत नाही. तसा शासनाचा नियमही आहे. ‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा केला जातो. मात्र, पालिकेकडून श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ अभियाना’चे तीन-तेराच होत आहेत.आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धामोकाट श्वानांमुळे रेबीज व इतर संसर्गजन्य आजार बळावतात. कुत्री कुठलेही पाणी पितात, विष्टा करतात. सोबतच विशिष्ट ऋतूमध्ये श्वानांवर गोचिड व इतर कीटक असतात. यामुळे जीवघेणे आजार उद्भवतात. या सर्व बाबींवर जन्मदर नियंत्रण हा एकमेव उपाय आहे.डॉ. सचिन पावडेबालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, व्हीजेएम, वर्धा

टॅग्स :dogकुत्रा