शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२,११० शेतकऱ्यांची कागदपत्रे पाठविली बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देपीककर्ज : वर्धा तहसील कार्यालयात ४८ तासांत होतोय निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच शेतकऱ्यांना पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे झटपट मिळावे या हेतूने वर्धा तालुका प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत वर्धा तालुक्यातील २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बँकांकडून यादी प्राप्त झाल्यावर वर्धा तहसील कार्यालयाकडून ४८ तासांतच प्रकरणांचा निपटारा केला जात आहे.कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा तहसील कार्यालयात विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे वर्धा तहसील कार्यालयाकडून बँकांना पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.तालुक्याबाहेरील १५४ शेतकऱ्यांना मिळाला आधारयादी प्राप्त झाल्यानंतर प्रकरण निकाली काढताना १५४ शेतकरी तालुक्याबाहेरील असल्याचे पुढे आले. या शेतकऱ्यांचेही पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहेत. यात सेलू १०५, देवळी २८ तर हिंगणघाटच्या २८ शेतकºयांचा समावेश आहे.अशी निकाली निघताय प्रकरणबँकेकडून ई-मेल द्वारे शेतकऱ्यांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाला प्राप्त होते. त्यानंतर या यादीची प्रिंट कनिष्ठ लिपीक कुणाल डबरे घेत ती तलाठी विभागाला पाठवितो. सोनाली भोयर व त्यांचे सहकारी सातबारा, आठ-अ, नकाशा गोळा करतात. तर रेकॉर्ड रुम मधील खंडाकर, राऊत, गोटे, मेश्राम, संदीप सुरकार, लोचन गुरनुले, हर्षल बधेकर, अमोल काटकर हे शेतकऱ्यांच्या फेरफार पंजीचा शोध घेऊन त्याची प्रमाणीत प्रत गोळा करतात. त्यानंतर हे संपूर्ण कागदपत्रे बमनोटे या शिपायामार्फत बँकांमध्ये पाठविले जातात.१०७ याद्या निकालीएखाद्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी बँकेत आवेदन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या प्रकरणाला लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची मागणी बँकेकडून तहसील कार्यालयाकडे केली जाते. आतापर्यंत वर्धा तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांच्या ११३ याद्या बँकांकडून प्राप्त झाल्या. त्यापैकी १०७ याद्यातील शेतकऱ्यांची कागदपत्रे तहसील कार्यालयाने बँकांना पाठविले आहे.बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन पीककर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ४८ तासांच्या आत बँकांना पुरविले जात आहे. यासाठी विशेष यंत्रणा वर्धा तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहे.- डॉ. शकुंतला पाराजे, नायब तहसीलदार, वर्धा.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज