शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने घेतला बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

नजीकच्या टाळळी येथील किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (१६) याच्या पोटात बुधवारी पहाटेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. रवींद्र देवगडे उपस्थित नसल्याने आरोग्य सेवकाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार श्रेयसवर उपचार सुरु केले.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रात तोडफोड : आरोग्य सेवकाने केले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवेकाने उपचार केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून मृताच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात तोडफोड केली. बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नजीकच्या टाळळी येथील किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (१६) याच्या पोटात बुधवारी पहाटेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. रवींद्र देवगडे उपस्थित नसल्याने आरोग्य सेवकाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार श्रेयसवर उपचार सुरु केले. त्याला एक इंजेक्शन व गोळ्या दिल्यानंतर ते घराकडे परत आले. काही वेळात पुन्हा असह्य वेदना सुरु झाल्यामुळे त्याला आरोग्य केंद्रात नेत असताना श्रेयसचा वाटेतच मृत्यू झाला. डॉ. रवींद्र देवगडे यांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवकाने दिलेल्या इंजेक्शनमुळेच श्रेयसचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्रात जावून साहित्याची तोडफोड करीत काहींनी आरोग्य सेवकालाही मारहाण केली. या तणावपूूर्ण वातावरणाची माहिती वरिष्ठांना मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यासह सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल बेले, काँग्रेस नेते, शेखर शेंडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जि.प. सदस्य सौरभ शेळके, जि.प. सदस्य संजय शिंदे, टाकळीचे भूषण पारडकर, अंतरगावचे सरपंच बाबा उडाण, भाजपा तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, पोलीस अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या दरम्यान डॉ. देवगडे यांना निलंबित केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. सहा दिवसांपासून परिचारिकांचा संप असल्याने वडगावचा आरोग्य सेवक भगत यांची रात्रपाळी ड्युटी होती. तिसरे वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे.डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवकाने उपचार केले पण, बालकाचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल. मृताची उत्तरीय तपासणी झाली असून प्राप्त अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य