शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

सेवा हमी कायद्याची गरज भासवू नका

By admin | Updated: May 27, 2017 00:30 IST

अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा विकास झपाट्याने होत आहे.

ग.दि. कुलथे यांचे आवाहन : महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा विकास झपाट्याने होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला सेवेची हमी देणारा कायदा केला. अधिकाऱ्यांनी या सेवा हमी कायद्याची गरजच पडणार नाही, इतक्या चांगल्या सेवा जनतेला उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी केले. शुक्रवारी जिल्हा परिषद सभागृहात महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघाची बैठक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य संघटक शिवदास वासे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, संघमित्रा ढोके यांची उपस्थिती होती. अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा पाठपुरावा सतत राज्य शासनाकडे महासंघ करीत आहे. यामध्ये निवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करण्यात यावे, या मागणीचा अभ्यास करण्यासाठी कटुवा समिती नेमली आहे. पुढील तीन महिन्यात यावर निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा केंद्राप्रमाणे दोन वर्षे करण्यात यावी, या मागणीसाठी जास्त पाठपुरावा करावा लागणार आहे. प्रधान सचिव भगवान सहाय यांच्याकडे हा विषय सोपविण्यात आला असून याबाबतीत सर्व विभागांचा अभिप्राय मागविण्यात येत आहे. जनतेची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज आहे. यामुळे रिक्त पदे भरण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार बैठका घेण्यात आल्या. यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना महासंघाचा पाठिंबा शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांने अन्न पिकविले नाही तर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आता शेतकरी आणि शासनाने एकत्र बसून यातून मार्ग काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या सर्व न्याय मागण्यांना अधिकारी महासंघाचा जाहीर पाठींबा असल्याचे कुलथे म्हणाले.