शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आधी करा दारूबंदी, नाहीतर करू गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:54 IST

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गाव खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ३० जानेवारीपूर्वी यावर उपाययोजना करून बिहार राज्याप्रमाणे कडक शिक्षेचा कायदा करावा. तसेच व्यसनमुक्ती योजना अंमलात आणून प्रत्येक गाव व शहरातील वस्त्यांमधील दारु पिणाऱ्यांची नोंदणीकरून त्यांना व्यसनमुक्त करावे.

ठळक मुद्देसावित्रीच्या लेकीचे आक्रोश आंदोलन : महिला मेळाव्यात घेतला निर्णय, पालकमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गाव खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ३० जानेवारीपूर्वी यावर उपाययोजना करून बिहार राज्याप्रमाणे कडक शिक्षेचा कायदा करावा. तसेच व्यसनमुक्ती योजना अंमलात आणून प्रत्येक गाव व शहरातील वस्त्यांमधील दारु पिणाऱ्यांची नोंदणीकरून त्यांना व्यसनमुक्त करावे. त्यासाठी प्रत्येक तहसीलमध्ये १० व्यसनमुक्ती केंद्र काढावीत. अन्यथा लोकप्रतिनिधींना गाव बंदी करु, असा निर्णय दारुबंदीसाठी झटणाºया महिलांच्या मेळाव्यात घेण्यात आला असून विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले.स्थानिक रुरल मॉल येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दारुमुक्ती तथा दारुबंदी महिला मंडळ व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दारुमुक्ती आंदोलनाचे सयोजक भाई रजनीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उषा कांबळे, संघटिका सरोज किटे, सुमन बागडे, मंगला देवतळे यांच्यासह कष्टकरी तसेच दारूबंदीसाठी अहोरात्र झटणाºया महिलांची उपस्थिती होती. यावेळी गावातील व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्यासाठी नि:शुल्क व्यसनमुक्ती केंद्र उभारावे व बेरोजगार युवकांना गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामोद्योग उभे करुन रोजगार द्यावा. जिल्ह्यात अवैध दारु विक्रीला स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यामुळे दारूग्रस्त विधवा, अत्याचारग्रस्त निराधार महिलांचे मुलाबाळासंह सर्वांगीण पुनर्वसन करावे. त्यांच्यासाठी आधार केंद्र काढावे गाव व शहरी भागात झालेल्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक नुकसाणीपोटी गावांना एक कोटी व शहरांना पन्नास कोटीपर्यंत ग्रामोद्योग व ग्रामीण विकासासाठी निधी द्यावा. अशा विविध मागण्यांच्या पत्राला मान्यता देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार पंकज भोयर यांना सरोज किटे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी क्षिप्रा लोखंडे, निलीमा मोहोड, ज्योती पोटदुखे, रिता हिवाळे, सविता चौधरी, पुष्पा कांबळे यांच्यासह बाबाराव किटे, बळवंत ढगे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी