शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:42 IST

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे.

ठळक मुद्देविनोद तावडे : जिल्ह्यात ८३७ कोटींची कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजन सणाला शासनाने शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची सर्वोत्तम भेट दिली, असे मत शालेय शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.विकास भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमुक्तीचा शुभारंभ कार्यक्रम व पात्र शेतकरी कुटुंबांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक तालुक्यातील तीन शेतकºयांचा प्रमाणपत्र, सदरा, पायजमा, साडी, चोळी देऊन २५ शेतकरी कुटुंबाचा तावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या २५ शेतकºयांना १० लाख ८५ हजार ६५१ रुपयांच्या कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तावडे पूढे म्हणाले की, सत्तेवर आल्यापासून शासनाने शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी पावले उचलली. जलयुक्त शिवारमुळे सिंचन क्षेत्रात वाढ, कृषी पंप जोडणी शेतकºयासाठी अनेक नवीन योजना सुरू करून त्याच्या शेतातील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले; पण पाच वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्याला बँकेतून कर्ज मिळणे बंद झाल्याने शेतीची अर्थव्यवस्था संकटात आली होती. यामुळे शेतकºयांना कर्जमुक्त करणे निकडीचे होते. कर्जमाफीचा लाभ खºया शेतकºयांना मिळावा म्हणून शासनाने अटी घातल्या. यात आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, मनपा सदस्य व अधिकारी असे १२ लाख शेतकरी यातून थेट बाहेर पडले. याचा लाभ शेतकºयांना मिळाला, असे सांगितले.खा. तडस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आजपर्यतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली. याचा लाभ खºया शेतकºयांना मिळाला, याचा सर्वाधिक आनंद होत आहे. आॅनलाईनमुळे शेतकºयांना थोडा त्रास झाला; पण भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळे अपात्र शेतकरी वगळले गेले. डबघाईस निघालेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामुळे सुरळीत चालण्यासाठी मदत होईल. ज्यांच्या ठेवी बँकेत होत्या, त्यांना त्या काढता येतील. शिवाय शेतकºयांना या बँकेतून पुन्हा कर्ज मिळू शकेल.कर्ज थकल्याने शेतकºयांना कर्जपुरवठा थांबला होता. त्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने कर्जमुक्ती योजना राबविली. यात पात्र लाभार्थ्याचे आ. सोले, कुणावार व डॉ. भोयर यांनी कर्जमाफीबद्दल अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्याच्या परिस्थितीवर कडू यांनी प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाºयांनी ३५ दिवस १२-१३ तास काम करून याद्या केल्या. सहकारी बँकेच्या २१ हजार ५९६ शेतकºयांना १३७ कोटीची कर्जमाफी मिळणार आहे. उर्वरित राष्ट्रीयकृत बँकेचे थकबाकीदार शेतकºयांना ७०० कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. प्रत्येक खातेदाराचे व्यक्तीगत लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यामुळे एकही अपात्र लाभार्थी सापडणार नाही.आठही तालुक्यातील २५ शेतकरी कुटुंबांचा सन्मानछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने बुधवारी आठही तालुक्यातील २५ शेतकरी कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. यात वर्धा तालुका- हनुमान मधुकर पिसे, रवींद्र परसराम नाईक, उत्तम तुकाराम पोहणकर, बयना एकनाथ भगत, हिंगणघाट- धनराज बाबाराव एंगट, चंद्रभान नानाजी बावणे, अशोक शंकर वासेकर, आर्वी - कैलास सखाराम पाटील, मोरेश्वर शंकर कोलाने, राजू विठ्ठल खुने, आष्टी - हरीदास नामदेव गवळी, देवेंद्र विश्वासराव कोहळे, मधुकर काशिराम जाने, कारंजा - विनोद रमेशराव टुले, सुभाष भीमराव ढोले, मोहन हरीराम मुने, सेलू - नामदेव शंकरराव किनगावकर, रामदास उत्तमराव रूमाले, कवडू नारायण सुरजूसे, देवळी - भारत पुुंडलिक राऊत, सुरेंद्र रामकृष्ण पाचघरे, इंदू किसना श्रीरामे, समुद्रपूर - बालाजी नत्थूजी कामडी, ज्ञानेश्वर रामाजी काटवले, कवडू शिवराम मून यांचा समावेश आहे.