शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कारंजाच्या दिव्यांग बांधवांनी सर केले कळसूबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 5:00 AM

अनेकांनी फक्त  शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची  जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्दे२० जिल्ह्यातील ७० दिव्यांग झाले होते सहभागी : नववर्षाच्या प्रारंभी राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहोचून महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांनी नववर्षाचे स्वागत केले. शिखर सर करणाऱ्यांमध्ये कारंजा (घा.) येथील दोघांचा समावेश आहे.अनेकांनी फक्त  शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची  जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले. गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरवर्षी शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने ही संधी उपलब्ध करून देण्यात येते. या मोहिमेत सहभागी झालेले सर्व दिव्यांग कळसूबाईच्या पायथ्याशी जहाँगीरदारवाडी या गावात एकत्र आले होते.  ३१ डिसेंबरला दुपारी २ वाजता सर्वांनी कळसूबाई शिखर चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, कळसूबाई माता की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखर चढाईसाठी कूच केले. या मोहिमेत सहभागी स्त्री व पुरुष दिव्यांग एकमेकांना आधार देत होते. रात्री ७ वाजता सर्वांनी कळसूबाई शिखराचा माथा गाठला. शिखरावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाऱ्यात सर्वांनी तंबूमध्ये मुक्काम ठोकला. नववर्षाच्या पहाटे म्हणजे १ जानेवारीला माथ्यावर असणाऱ्या कळसूबाई मंदिरात त्यांनी कळसूबाईचे दर्शन घेतले.  तसेच उगवत्या सर्याला नमस्कार करीत सर्व प्राणिमात्राला सुखी ठेव असे साकडे घातले. त्यानंतर सकाळी १० वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यासाठी सुरुवात केली.  दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी  जहाँगीरदारवाडी गाव गाठले. विविध प्रकारचे दिव्यांग यात सहभागी झाले होते. सर्व सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने कळसूबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.  उपक्रमात सहभागींवर कोैतुकाचा वर्षाव होतो आहे.  

टॅग्स :New Yearनववर्ष