शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील डायव्हर्शन पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:24 IST

आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देमध्यरात्री दोन वाजतापासून वाहतूक ठप्प : जीवितहानी नाही, चार ट्रक थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. शेकडो वाहनांचा मुक्काम जागीच झाला. बुधवारी सकाळी ६ वाजता पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. पाण्याचा वेग जास्त असल्याने काळजाचा ठोका वाढविणारे चित्र पाहायला मिळाले.निर्माणाधीन पुलाचे बांधकाम उन्हाळ्यात संथगतीने करण्यात आले. वेळेवर पूल झाला नाही. त्यामुळे बाजूला केलेल्या डायव्हर्शनवरून हजारो वाहने धावत होती. हा पूल जाम नदीवर असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने त्याचा प्रवाह डायव्हर्शनमुळे खुंटला होता. मात्र, पुराने रौद्र रूप धारण केल्याने टाकलेल्या १२ पायल्यांसह पूल वाहून गेला. पाण्याचा वेग जास्त होता. शिवाय, खळखळ आवाज आल्याने बाजूला झोपड्यांमध्ये राहणारे कंपनीचे कर्मचारी आले. लागलीच वाहन चालकांना थांबविण्यात आले. या मार्गाने जाणारे ४ ट्रक एकामागे एक जात होते. येथे कुणी सूचना करायला आले नसते तर अनर्थ झाला असता. याची कल्पनाच न केलेली बरी, अशा प्रतिक्रिया ट्रकचालकांनी लोकमतशी बोलताना दिली.बुधवारी सकाळी पावसाची दमदार हजेरी सुरूच होती. पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व वाहतूक आष्टी, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, बोरगाव (टुमणी), साहूर, वरूड तर काही वाहतुक साहूर, माणिकवाडा, नारा, काकडा, सुसुंद्रामार्गे कारंजा वळविण्यात आली. सकाळी महामार्गावर पोलिसांनी पाहणी करून वाहतुक सुरळीत केली.निर्माणाधीन पुलाकडे दुर्लक्षया रस्त्याचे काम आंध्रप्रदेश मधील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते. पुलाचे काम सुरू केल्यावर अनेक दिवस स्लॅब टाकला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू होण्यात बराच अडथळा निर्माण झाला होता. कंपनीचे अधिकारी या पुलाकडे फिरकत नव्हते. त्यामुळे आजचा भीषण प्रसंगाला पाहण्याची ग्रामस्थांवर वेळ आली.परिसरातील शेतात पाणीच पाणीजाम नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेती जलमय झाल्या आहेत. अनेक शेतातील भागात भगदाड पडले आहे. पीकही खराब झाले आहे. धाडी येथील विजय मानकर, अशोक तनाटे, सुयोग चोरे यांनी वळणमार्गे वाहतुकीची माहिती वाहनचालक आणि प्रवाशांना दिली. शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर