शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार,‎ दिवाकर रावते यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 16:29 IST

परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून  त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल.  

वर्धा: परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून  त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल.  तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा 25 टक्के जागा ठेवणार आहे. कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. मुंबईतील कर्मचा-यांसाठी 1 हजार घरे बांधून देण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन मंञी दिवाकर रावते यांनी वर्धा येथे सांगितले. आज वर्धा बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या गावातच नियुक्ती  देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांची ओढाताण कमी होऊन कुटुंबाला वेळ देण्याबतच त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असं रावते यांनी यावेळी म्हंटलं.  पालकत्वाच्या भूमिकेतून काम करतो असे सांगताना ते म्हणाले महिला कर्मचाऱ्यांच्या  सुरक्षेचाही विचार केला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. .

राज्यातील बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने होणारे बस्थानकाचे बांधकाम आता बंद केले आहे. राज्य परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानक बांधणार आहेत हे सांगताना ते म्हणाले 85 कोटीचे बस स्थानक राज्यात  बांधणार असून त्यामध्ये 48 कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. हा सर्व खर्च भांडवली खर्चातुन करण्यात येणार आहे.  याशिवाय विदर्भातील सर्व  जुने बसस्थानक रंगरंगोटी करून प्रवाशाना सुखद वाटतील, असे  करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 15 लक्ष 60 हजार रुपये निधीचे नियोजन केले आहे. याशिवाय 3 हजार प्रवाशी निवारे बांधण्यात येणार आहेत.तसेच सर्व बसस्थानके स्वछ ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.