शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

जिल्हा पुन्हा गारठला; पारा ९ अंशावर

By admin | Updated: January 23, 2016 02:12 IST

वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे.

उत्तरेकडील लाटेचा प्रभाव : पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचे संकेतवर्धा : वातावरणात हवेचा दाब वाढताच थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून किमान तापमान १२ ते १० अंशाच्या घरात आहे. यामुळे मध्यंतरी लोप पावलेल्या थंडीचा प्रभाव जाणवत आहे. एरव्ही रात्री उशीरापर्यंत शहरातील रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते; पण थंडीचा कडाका सुरू झाल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत रस्ते ओस पडलेले असतात. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या लाटेमुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका जाणवेल, असा अंजाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. हवेचा दाब वाढल्याने वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत आहे. मध्यंतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडून वाहणारे थंड वारे अडत होते. परिणामी, थंडीचा प्रभाव ओसरला होता. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला. जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवायला लागला होता. जानेवारी महिन्यात जाणवणारी थंडी ओसरल्याचा अनुभव येत होता. या काळात कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती. कमाल तापमान ३०.९ अंशावर स्थिरावले होते तर किमान तापमान १८ अंशापर्यंत होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला होता. लोप पावलेली थंडी जाणवायला लागल्याने शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे.विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी उनी कपडे घालून कार्यावर जाताना दिसले. दिवसभर बाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपडे घालूनच बाहेर पडणे पसंत केले. रात्रीच्या वेळी शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहे. यंदा हिवाळ्यातही तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर स्थिरावल्याने थंडीचा प्रभाव कमीच जाणवत आहे. यातही डिसेंबर अखेरीस थंडीची चाहुल लागल्यावर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याचा प्रत्यय येत होता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ पर्यंत असल्याने याचा परिणाम तापमान वाढीवर होऊन उकाडा जाणवायला लागल होता. यामुळे हिवाळ्यातच उनी कपड्यांचा व्यापारही थंडावला होता. थंडी पुन्हा स्थिरावत असल्याने जिल्हावासीय याचा आनंद घेताना दिसून येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)