शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची बोळवण; उपलब्ध करून दिले केवळ 810 व्हायल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा उपलब्ध होत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी सांगत असले तरी प्रत्येक वेळी वर्धा जिल्ह्याला नाममात्र लससाठा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची बोळवणूकच केली जात आहे.

ठळक मुद्देकोविड लसीकरण मोहिमेला गती देण्यात अनेक अडचणी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच दिवशी तब्बल १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविड लस देऊन नवा विक्रम करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य विभागाची लसकोंडीच सध्या शासनाकडून केली जात आहे. मंगळवारी सायंकाळ विदर्भाच्या वाट्याचा लससाठा नागपूर येथे पोहोचला. पण वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे केवळ ८१० व्हायल देण्यात आल्याने लसीकरण मोहिमेला गती द्यावी कशी असा प्रश्न सध्या आरोग्य विभागा पुढे आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा उपलब्ध होत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी सांगत असले तरी प्रत्येक वेळी वर्धा जिल्ह्याला नाममात्र लससाठा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची बोळवणूकच केली जात आहे. लससाठा उपलब्ध होताच आरोग्य विभाग नव्या जोमाने लसीकरण मोहिमेला गती देतो. असे असले तरी जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने लसीकरण केंद्रांवरून अनेकांना बहूदा आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येत वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

केवळ २.५९ टक्के व्हॅक्सिन वेस्ट- सोमवारपर्यंत वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे एकूण ४ लाख २५ हजार ८० डोस प्राप्त झाले. त्यापैकी ४ लाख १४ हजार ३८ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ २.५९ टक्के लस वेस्ट झाली असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.

असे करण्यात आले लसीचे वितरण- जिल्ह्याला कोविड लसीचे ८ हजार १०० डोस प्राप्त झाल्यावर बुधवारी वर्धा शहरासाठी ८०० डोस, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयांसाठी ३०० डोस, आठ ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी २०० डोस तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला १७० डोस वितरणीत करण्यात आले आहे.

आज ५६ केंद्रांवरून होणार व्हॅक्सिनेशनमंगळवारी रात्री वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे ८ हजार १०० डोस प्राप्त झाले. ही लस जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पाठविण्यात आली आहे. गुरूवारी याच तोकड्या लससाठ्याच्या जोरावर आरोग्य विभाग ५६ केंद्रांवरून लाभार्थ्यांना काेविडची प्रतिबंधात्मक लस देणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या