शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्ह्यात अपघातांनी काळवंडली धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:15 IST

होळीच्या पर्वावर जिल्ह्यात येणारी दारू रोखण्याकरिता पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; पण धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दारूचे पाट दिसून आले.

ठळक मुद्देसहा अपघातात तीन ठार : सेवाग्राम, कारला येथे घटना

ऑनलाईन लोकमतवर्धा : होळीच्या पर्वावर जिल्ह्यात येणारी दारू रोखण्याकरिता पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; पण धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दारूचे पाट दिसून आले. यातच झालेल्या अपघातांत तिघांचा बळी गेला. हे अपघात सेवाग्राम व कारला रोड परिसरात घडले. तिसरा अपघात वायगाव (निपाणी) येथे झाला असून यात एक जण जखमी झाला.अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई माधव फड आणि गृहरक्षक दलाचा शिपाई रवी चंदनखेडे दोन्ही रा. एकुर्ली यांची शुक्रवारी सेवाग्राम रुग्णालयात आरोपीजवळ कर्तव्य बजावत होते. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास दोघेही चहा पिण्याकरिता दुचाकी क्र. एमएच २२ एएम ७१४४ ने सेवाग्राम रुग्णालयाच्या बाहेर जात होते. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी जप्त केलेला ट्रक क्र. एमएच ३४ एबी ०७२० हा रस्त्याच्या कडेला उभा आहे. काळोखामुळे सदर ट्रक माधवला दिसला नाही आणि भरधाव दुचाकीची मागाहून ट्रकला धडक बसली. या भिषण अपघातात माधव फड व रवी चंदनखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अपघाताची नोंद घेतली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. पूढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे एकुर्ली गावात हळहळ व्यक्त होत असून अल्लीपूर पोलीस ठाण्यातही शोक व्याप्त आहे.व्हीडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाणअल्लीपूर पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या माधव फड याने मृत्यूपूर्वी रात्री एक व्हीडीओ तयार केला. त्यात मी आत्महत्या करीत असून माझा कुणावरही आक्षेप नाही, असे त्याने नमूद केले आहे. सदर व्हीडीओ त्याने स्वत: काढून तो व्हायरल देखील केला. हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर अपघात त्याने मुद्दामहून तर घडवून आणलेला नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमीवायगाव (नि) - नेरी येथील अविनाश सुधाकर सराटे (२४) हे शनिवारी सकाळी ९.३० वाजता दुचाकी क्र. एमएच ३२ एक्स २८१७ ने वायगाव (नि) येथे येत होते. दरम्यान, समोरून येणाºया भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात अविनाश सराटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघाताची वायगाव (नि.) पोलीस चौकीने नोंद घेतली असून तपास चौकी इंचार्ज गजानन दराडे करीत आहेत.कारच्या धडकेत युवक ठारवर्धा - भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी कारला चौक परिसरात घडला. तुषार प्रमोद जिंदे (१९), असे मृतकाचे नाव आहे. तो दुचाकी क्र. एमएच ३२ आर २५६५ ने जात होता. कारला चौक परिसरात त्याच्या दुचाकीला एमएच ३२ डीसी ९९२० क्रमांकाच्या कारने समोरून धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तुषारला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तपासणीअंती वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.दोन दुचाकी धडकल्या दोघे गंभीर जखमीगिरड - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी गिरड परिसरातील पेट्रोल पंपासमोर घडला. एमएच ३२ एस ८३२३ क्रमांकाची दुचाकी गिरड येथून समुद्रपूरकडे जात होती. दरम्यान, समुद्रपूरकडून गिरडकडे येणाºया एमएच ४० सी ९५७५ क्रमांकाच्या दुचाकीने समोरून येणाºया दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत. गिरड पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून वृत्त लिहीस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.दुचाकीच्या धडकेत महिला जखमीवर्धा - भरधाव दुचाकीने पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी रात्री भूगाव परिसरात घडला. बासंती रत्नाकर साहू (५५), असे जखमी महिलेचे नाव आहे. रत्नाकर व बासंती हे दोघेही पायी फिरत होते. दरम्यान, मागाहून आलेल्या भरधाव दुचाकीने बासंती यांना जबर धडक दिली. सावंगी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.पादचारी महिलेला दुचाकीची धडकपुलगाव - प्रात:विधी आटोपून पायी घराकडे जात असलेल्या महिलेला दुचाकी क्र. एमएच ३२ झेड १९५७ ने जबर धडक दिली. या अपघातात प्रमिला श्रावण तलवारे रा. रामपूर ही महिला जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. पुलगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात