शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:32 IST

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता झाले मतदान : ६०१ मतदारांचे भवितव्य मशीनबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत झालेल्या नोंदीवरून मतदानाची टक्केवारी सरासरी ८२ वर जाईल, असे चित्र होते. दिवसभर मतदानादरम्यान कुठेही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. एकंदरीत मतदानाची पक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.आज झालेल्या मतदानाकरिता ९६ हजार ६०१ मतदारांना हक्क बजावयाचा होता. याची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. असे असताना सुमारे २० टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६४.३१ टक्के मतदान झाल्याची नोंद होती. मतदानाकरिता अजूनही सुमारे दोन तासाचा कालावधी शिल्लक असल्याने हा आकडा सरासरी ८० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.८६, सेलू ६६.४६, देवळी ६५.७७, आर्वी ६९.८६, आष्टी ७३.६५, कारंजा ६९.६७, हिंगणघाट ७१.८१ आणि समुद्रपूर येथे ७१.०५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या नोंदीनंतर सुमारे दोन तास आणखी मतदान होणार असल्याने ही टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतीकरिता आजचे मतदान होते. जिल्ह्यात तब्बल ११२ ग्रामपंचायतीत निवडणूक होणार होती; मात्र चिन्ह वाटपाच्या कारणावरून सेलू तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली. यामुळे ८६ ग्रा.पं. करिता मतदान झाले. मतदानाच्या प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज करण्यात आले होते. या केंद्रात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. सर्वच केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले. कुठूनही काही वाद किंवा कुण्या उमेदवारात वाद झाल्याची माहिती नव्हती.सरपंचपदाचे ३०२ तर ६०१ सदस्यांचे भाग्य आज फळफळणारगावाच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतीला देण्यात आल्याने सरपंचपद महत्त्वाचे झाले आहे. यामुळे या पदाकरिता अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे. प्रत्येकालाच आपला विजय सहज दिसत असल्याचे प्रचाराच्या काळात त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. या उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ते मंगळवारी होणाºया मोजणीतून समोर येईलच.तालुका स्थळावर होणार मतमोजणीआज झालेल्या मतदानाची मोजणी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजतापासून होणार आहे. ही मोजणी तालुका स्थळावर होणार असून याकरिता प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तर सेलू येथे दिपचंद विद्यालय आणि आर्वी येथे गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे.आठही तालुक्यात होत असलेली ही मोजणी एकूण ७४ टेबलवरून होणार आहे. यात वर्धा तीन, सेलू दोन, देवळी १२, आर्वी नऊ, आष्टी तीन, कारंजा सहा, हिंगणघाट सहा, समुद्रपूर तीन असे टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहायक, असे ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. काही अडचण आल्यास २० कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कामाकरिता एकूण १०८ कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले आहे.मतमोजणी दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त राहणार आहे.जीप चालकावर गुन्हानिवडणुकीतील वाहनाच्या गैरवापराचा ठपकालोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात तहसीलदारांनी कृषी विभागाची जीप गाडी निवडणूक कामात वापरण्यासाठी रितसर घेतली असताना ती नियोजित ठिकाणी न ठेवता चालकाने परस्पर तिचा वापर केला. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून घोडमारे विरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तहसीलदारांच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार कृषी विभागाचे एमएच ३२ जे २७० क्रमांकाचे वाहन निवडणूक कामात वापरण्यासाठी असताना त्यावरील चालकाने ते परस्पर इतरत्र नेले. या कारणावरून चालकाने निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरूद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली. सेलू पोलिसांकडून भादंविच्या कलम १८८ व लोकप्रतिनिधी कायदा १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या निवडणुकीत सेलू तालुका या ना त्या कारणाने चर्चेतच राहिल्याचे दिसून आले.