शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मिळणार आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 15:13 IST

वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी उपक्रम राबविण्यात येत आहे.

वर्धा : वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवाऱ्याची व्यवस्थेसह भोजन व अल्पोहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर उपहारगृह व निवासीगृहाची संचालन जबाबदारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. वर्धा यांना देण्यात आली आहे. सदरशी जुळून असलेल्या महिला बचतगटाच्या महिला रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबीयांना मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून सुविधा देणार आहे. कार्यक्रमाला स्वाती वानखेडे, अमोल भागवत, रजनी शिरभैय्ये, विलास झोटिंग यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुविधांचा लाभ घ्या - जिल्हाधिकारीजिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय अल्प दरात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, अल्पोहार व निवा-याची सुविधा करून देण्यात आली आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.