शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खाकीचे भय हरले, अवैध धंदेवाईकांचे उंचावले मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:39 IST

जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देदारूबंदी कार्यकर्त्यांवर हल्ले। कायदा, सुव्यवस्था पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात जोमात सुरू असलेली दारूबंदी, नाममात्र कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे उंचावलेले मनोबल, यातून दारूबंदी कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले यामुळे खाकीचे भय हरल्याचा प्रत्यय येत असून कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे; मात्र सर्वत्र दारूचे पाट वाहतात. शहरात विदेशीचा बोलबाला, तर गावखेड्यात गावठी दारूभट्टीचा धूर निघतो. मात्र, दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता पोलिस विभागाचे प्रयत्न थिटे पडत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावागावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करून पोलिस विभागालाही दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनीही नव्याची नवलाई म्हणून शहरातील पोद्दार बगिचा परिसरातील एका बड्या दारूविक्रेत्यावर छापा घालून कारवाई केली. इतर दारूविक्रेत्यांवर कारवाईचे काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिस विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने सद्यस्थितीत शहरातील विविध भागांत दारूचे गुत्थे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई केलेला बंद खोलीतील ‘तो’ बार परत सुरू झाल्याची माहिती आहे. शहरात अनेकांनी अशाच प्रकारे बंद खोलीत बार थाटले आहेत. असे असताना केवळ एका-दोघांवर कारवाई करून पोलिस विभाग नामानिराळा झाला. हिंगणघाट येथे तिघा दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केला.यापूर्वीही पोलिस कर्मचारी आणि सर्वसामान्यांवर दारूविक्रेत्यांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पालकमंत्र्यांनी दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना पोलिस विभाग सुस्त आहे. कठोर कारवाईअभावी दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.डीबी पथके बनली वसुली पथकेशहरात शहर आणि रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकांचा दारूविक्रेत्यांकडून वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. एका दारूविक्रेत्याकडून महिन्याकाठी २० ते २५ हजारांची रक्कम वसूल केली जात आहे. या पथकांनी पैसे द्या आणि व्यवसाय सुरू करा, अशी मुभाच विक्रेत्यांना दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी