शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त पण, प्रशासनाच्या लेखी सुकाळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:23 IST

Government Wardha News सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराजकीय पक्षांनी घेतला आक्षेप केवळ ४६३ गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे. आठही तालुक्यातील केवळ ४६३ गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत तर ८७५ गावातील आणेवारी ५० च्यावर असल्याचे दर्शविल्याने या आणेवारीवर राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदविला आहे.

जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. निसर्गकोप आणि रोगांचा प्रादुर्भात यामुळे सोयाबीनच्या पिकांचा जबर फटका बसला. तसेच कपाशीचे पीकही हातचे जाण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिंधींकडून पंचनामे करण्याची मागणी होत असतानाही कृषी विभाग निद्रावस्थेत आहे. कृषी विभागाच्या या कुंभकर्णी झोपेमुळेच बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट झाला. शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचे संकट पेलावे लागले.

जिल्ह्यात सर्वत्रच दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शासनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत नजरअंदाज तर ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधािरत आणेवारी काढली असता प्रशासनाच्या लेखी १ हजार ३३८ गावांपैकी ८७५ गावांत ५० पैशावर तर ४६३ गावांतील आणेवारी ५० पैशांच्या आत नमूद करण्यात करण्यात आली. त्यामुळे ही आणेवारी फसवी असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत असून ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम आणेवारीत ही आकडेवारी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

 मी हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी व वर्धा तालुक्यात फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  शेतकऱ्यांशी संवाद साधला असता कुठेही समाधानकारक परिस्थिती नाही. सर्व पीक उद्‌ध्वस्त झाले असून उत्पादनाची काहीच शास्वती नाही. अशाही स्थितीत प्रशासनाची आणेवारी ५० पैश्याच्या वर निघेतच कशी, हा प्रश्न आहे. यावरुन प्रशासनाने टेबलावर बसूनच अहवाल तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याबाबत जाब विचारला जाईल.- अभिजित फाळके,  संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक पाहणी केली. सोयाबीनही गेले आता कपाशीवरही बोंडअळींने आक्रमण केल्याने कपाशीही उद्‌ध्वस्त झाली आहे. पण, अद्यापही पंचनामे झाले नाही, ही शोकांतिका आहे. त्यातच प्रशासनाची आणेवारी चक्रावून टाकणारी असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे बांधावर जाऊन पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.- समीर कुणावार, आमदार

टॅग्स :agricultureशेती