शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जंक्शन जलवाहिनी फूटल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:24 IST

शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

ठळक मुद्देम्हणे अंदाज चुकला : १९९८ पासून मेंटेनन्स निघालेच नसून जुन्या जलवाहिनीचा नकाशाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सदर बाब न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात येताच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या ४८ तासात दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांंकडून व्यक्त केला जात आहे.वर्धा शहरातील नागरिकांना धामनदीच्या येळाकेळी आणि पवनार येथील पात्रातून पाण्याची उचल करून पाणी पुरवठा केल्या जातो. वर्धा शहरात सध्या अमृत योजनेंतर्गत ठिकठिकाणी भूमिगत गटारवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. असेच खोदकाम काम सुरू असताना स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आर्वी मार्गावर सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली. परिणामी, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. विशेष म्हणजे फुटलेली जलवाहिनीही जंक्शन लाईन असून ती फार पूर्वी टाकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर १९९८ पासून तिचे मेंटेनेन्सचे काम निघाले नव्हते. न.प.तील जुन्या कर्मचाºयांकडून या परिसरात जलवाहिनी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, खोदकाम करताना सुमारे १० मीटरचा अंदाज चुकला. उल्लेखनिय म्हणजे पूर्वीच्या जलवाहिनीचा कुठलाही नकाशा नगर परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच शहरातील नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.

टॅग्स :Waterपाणी