शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

विकासाच्या नावावर विनाशाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:18 IST

अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.

ठळक मुद्देमाला माथुर : जाजू महाविद्यालयात तपोधन श्रीकृष्णदास जाजू जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाने जो विकास साधला आह, हा काही चमत्कार नाही. त्यासाठी अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कालभूत होते. डॉ.उल्हाज जाजू, उपप्राचार्य प्रा.सुरेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माला माथुर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याशी स्पर्धा करून वाईट विचारांचा मनात शिरकाव करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा. समर्पित भावनेने आपले जीवन व्यथित करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तपोधन श्रीकृष्णदास जाजू हे माझे आजोबा होते. यावेळी डॉ.उल्हास जाजू यांनीसुद्धा मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पुरूषोत्तम कालभूत यांनी तपोधन जाजू यांच्या कार्याचा वसा घेण्याचे आवाहन केले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यानुसार आपले कार्य असले पाहिजे. महात्मा गांधी आणि तपोधन जाजू यांचे कार्य असे होते. महात्मांच्या विचारावरच ते चालले, कारण त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत. याच विचारांच्या बळामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असेही डॉ.कालभूत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. मिलिंद माने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सलीम शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक