शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:39 IST

माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे.

ठळक मुद्देडासांचा प्रादुर्भाव : माणिकवाडा ग्रां.प.मध्ये सावळागोंधळ, नालीतील सांडपाणी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमध्ये घाण असल्याने दूषित पाणी नळांना जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गावातील नालीमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. याची कल्पना देवूनही ग्रामपंचायत मात्र काहीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.माणिकवाडा गावात सार्वजनिक चौक व मोकळी जागा आहे. गावातील मुख्य बसस्थानक परिसरात असलेली पाणीपुरवठा टाकी पूर्णत: असुरक्षित आहे. टाकीच्या सभोवताल असलेले तारेचे कुंपन तुटलेले आहे. लोखंडी फाटक असून त्याला कुलूप लावल्या जात आहे. पाणी सोडण्यासाठी असलेले व्हॉल्व्ह घाणीने माखले आहे. त्यात दूषित पाणी आहे. सर्र्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. व्हॉल्व्हकरिता बांधलेल्या टाक्याही घाणीत आहे. शिवाय सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावरून वाहत आहे. आरोग्य उपकेंद्रासमोरची नाली बुजून पाणी इतरत्र वाहत होते. यात डास निर्माण होत आहे. या त्रासापोटी नाला उपसण्याची मागणी तेथील परिचारीकेने ग्रामपंचायतला दिली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून शेखणताचे ढिगारे उघड्यावर आहे. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.मनरेगामधून काम मिळेनारोजगार हमी योजनेमधून गावकरी रोजगार मागत आहे. त्यांना काम देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. मजुरीचे मस्टरही काढल्या जात नाही. रोजगारसेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. रोजगार सेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागीतल्यावरही देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.