शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसामुळे पिकांवर रोग

By admin | Updated: August 12, 2016 01:45 IST

संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे.

शेतकरी हवालदिल : तूर करपली तर कपाशी पडली पिवळी कारंजा (घा.) : संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे. सोयाबीनवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. यामुळे पिके हातात येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाही नापिकीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, भूईमुंग, मुंग आदी पिकांची पेरणी केली. होता नव्हता पैसा लावला. पावसाने चांगली सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला होता. पेरणी साधली. यंदा सुगीचे दिवस येतील, अशी स्वप्ने पाहत असतानाच संततधार पावसाला सुरूवात झाली. ८ जूनला सुरू झालेला पाऊस वाढत गेला. ४ आॅगस्टपर्यंत तालुक्यात एकूण ६१५.२ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ ४३१.४ मिमी पावसाची नोंद होती. गतवर्षी तालुक्यात ९०० किमी एकूण पाऊस झाला. त्या तुलनेत यंदा दोन महिन्यांतच ७० टक्के पाऊस झाला. पावसाचे आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहेत. या महिन्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे मत पर्जन्यमान विभागाने व्यक्त केले आहे. सततच्या पावसामुळे पाणी साचून जमिनीतील हवेचे प्रमाण कमी झाले. यामुळे पिकांवर अनेक रोगांचे आक्रमण होत आहे. सोयाबीनच्या पानांवर रोग आला. तूर करपली. कपाशीची पाने पिवळी पडली आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. सततच्या पावसामुळे आंतर मशागत करता आली नाही. तण वाढले. निंदणाची कामे खोंळंबली. निंदणाची मजुरीही वाढली. तननाशकही अति पावसामुळे निष्प्रभावी ठरले. एकंदरीत अती पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी अवृष्टी तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागणार, असे दिसते. तालुक्यात यावर्षी सर्वाधिक ४६ हजार ४१७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणली. चांगले उत्पादन येईल या आशेने शेतकरी अत्यंत परिश्रम घेत आहेत; पण संततधार पावसामुळे मेहनत व्यर्थ ठरणार असल्याचेच चित्र आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम राहिले तर पिकांना वाचविणे कठीण होणार आहे. यामुळे उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)