शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालक-मालक संघटनेची केंद्रीय मंत्र्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:25 IST

संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देप्रमुख समस्या मांडल्या : देशात सर्वत्र समान वाहन कर लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे विदर्भ अध्यक्ष अविनाश केळकर, विदर्भ उपाध्यक्ष किशोर शेंडे, विदर्भ कार्याध्यक्ष राहुल हाडके, संपर्क प्रमुख अनंता देशमुख, वर्धा जिल्हा अध्यक्ष नितीन चौधरी, सचिव योगेश खेडकर, जयंत परिमल, लकी अली, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विरेंद्र कांबळे, रितेश देशमुख, सोपान धरोकार आदी उपस्थित होते. यावेळी नामदार गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशात विविध राज्यात खासगी वाहन आहेत. पण क्रुझर या गाडीला इतर राज्यात १२ अधिक १ चे मॅक्झी परमिट आहे. इतर वाहन ८ अधिक १ परमिट आहे, तेच महाराष्ट्र राज्यात ९ अधिक १ परमिट आहे. राज्यात क्रु झर गाडीला १२ अधिक १ चे टॅक्सी परमिट व टाटा सुमो, टवेरा, बोलेरो या वाहनांना ९ अधिक १ किंवा ८ अधिक १ परमिट द्यावे, अशी मागणी करण्यात आली. टॅक्सी परमिट वाहनाचा कालावधी हा ८ वर्षे तर प्राव्हेट वाहनाचा कालावधी हा १५ वर्षे आहे. टॅक्सी परमिट वाहनाचा कालावधी हा १५ केला तर फायनान्स व परिवार चालविणे व्यवस्थित पार पडेल. भारतामधील सर्व राज्याचे टॅक्स सारखे करण्यात यावे, अशी मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली.