शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वर्धा भाजपा नगरसेवकात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:08 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची झाली आर्थिक गोची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीत या असंतोषाची चुणूक दिसली. त्यानंतर भाजपने आपल्या धोरणात कोणतीही दुरूस्ती केली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला गड कायम राखताना बरीच कसरत करावी लागणार आहे.वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सध्या मितेश भांगडीया हे आमदार आहेत. भांगडीया यांचा जनसंपर्क तसा कमी आहे. त्यामुळे नव्या नगर सेवकांशी त्यांचा परिचय नाही. काही भाजपकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. भांगडीया यांच्या जागी भाजपचे प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद व बहुतांश नगरपालिका भाजपच्या हाती आहे. जवळ जवळ ४०० पैकी अडीशेपेक्षा अधिक मतदार भाजपकडे आहेत. मात्र नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष सरकारच्या धोरणाविषयी आहे. काँगे्रसच्या काळात नगर पालिकेतील बहुतांश कामे ही नगरसेवकाच्या माध्यमातूनच गावात करण्यात येत होती. भाजप सरकारने नगर पालिकेचे सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केले आहे. यामागे कामाची गुणवत्ता हे प्रमुख कारण दिले जात आहे. नगर पालिकेकडून काम करण्यात येत नसल्याने नगरसेवकांची मोठी आर्थिक गोची झाली आहे. तसेच भाजपकडून निवडून आलेल्या बरेचशे नगरसेवक हे जुने काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेची निवडणूक ही आपल्याला लाभ देणारी असते, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट नगरपालिकेचे राकाँ गटनेते सौरभ तिमांडे यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लढविली होती. यात त्यांनी ९६ मते मिळविले. भाजपचे अनेक मते या निवडणुकीत फुटली. याची दखल भाजपने घेतली असली तरी पुढे मते फुटू नये यासाठी नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यात काहीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे असंतोष कायम आहे. भाजपची कसोटी यानिमित्ताने लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा