शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

महावितरणचे ‘डिजिटलायजेशन’; 132 कोटी 69 लाखांचा ‘ऑनलाईन’ भरणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 5:00 AM

२०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिलाच्या देयकाचा भरणा केला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नव्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी ‘कॅशलेस’ वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७५ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ‘ऑनलाईन’ पर्याय निवडला आहे. २०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिलाच्या देयकाचा भरणा केला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते. कोरोना काळात ऑनलाईन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने आजघडीला हे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन वीजबिल भरत असल्यास त्या ग्राहकाला ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत सूट मिळते. ही बाब ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. महावितरणने सर्व वर्गावरील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणच्या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र आरटीजीएस सुविध उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहक सेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांवर असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरारी-    ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ मध्ये ४ लाख ४५ हजार ८४८ ग्राहकांनी ९७ कोटी ५ लाख रुपयांचा ऑनलाईन देयकाचा भरणा केला होता. मात्र, २०२१-२२ मध्ये ही संख्या दुपटीने वाढली असून, ७ लाख ५१ हजार ६६९ ग्राहकांनी तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने देयके भरली आहेत, हे विशेष.

गो ग्रीन संकल्पनेकडे वाटचाल...-    महावितरणच्या ऑनलाईन पद्धतीने गो ग्रीन या संकल्पनेला प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीची वाटचाल यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. -    येत्या काळात वीजबिलाची वसुली १०० टक्के  ऑनलाईन करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न राहणार असून वीज ग्राहकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज