शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी पडताळणीसाठी टीईटी प्रमाणपत्र जमा केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत दहा आणि माध्यमिक विभागांतर्गत ४ अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने टीईटीधारक शिक्षकांना प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील दहा शिक्षकांची प्रमाणपत्रे पुण्याला पाठविण्यात आली आहेत. आता या प्रमाणपत्रांची पुण्यात तपासणी सुरू असल्याने गुरुजींचीही धाकधूक वाढली आहे.जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत दहा आणि माध्यमिक विभागांतर्गत ४ अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये शिक्षक भरती न झाल्याने फारशी संख्या नाही. ज्या शिक्षकांची टीईटीव्दारे नियुक्ती झाली त्या सर्वांचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले असून आता काय निकाल लागतो, याकडे लक्ष लागले आहे. 

पुण्यात पोहोचले प्रमाणपत्र...

टीईटीच्या परीक्षेतील बोगसपणा चव्हाट्यावर आल्यानंतर अशा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या गुरुजींची झोप उडाली आहे. जिल्ह्यातही १४ शिक्षक टीईटीच्या माध्यमातून लागल्याने त्यांचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाने पुण्याला चौकशीकरिता पाठविले आहे.

गुरुजीचे देव पाण्यात२०१२ पासून शिक्षक भरती बंद होती. प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गावर टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या अनेक जिल्ह्यात नियुक्त्या झाल्या. अशातच आता बोगस टीईटी प्रमाणपत्राचा काळाबाजार उघडकीस आल्याने अडचणी वाढल्या आहेत. याच काळ्या बाजारातून टीईटीचे प्रमाणपत्र मिळवून तर या नोकऱ्या बळकावल्या नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०१३ नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील दहा शिक्षक हे टीईटीव्दारे नियुक्त झाले आहेत. त्यामुळे प्राथमिक विभागाकडून या दहा शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासणीकरिता पाठविण्यात आले. तसेच माध्यमिकची चार प्रमाणपत्रे पाठविली आहेत.निंबाजी सोनवणे,               शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

टॅग्स :Teacherशिक्षक