शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला विद्यापीठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:33 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही.

ठळक मुद्देमनोहर धोंडे : सोलापूर विद्यापीठाला ‘शिवयोगी श्री सिद्धेश्वर’ नाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. आरक्षणाचे आश्वासन विसरून धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली होती. धनगर समाजाला विद्यापिठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे आहे. शिवाय आता सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धरणे देणार असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. धोंडे पुढे म्हणाले, आपण सध्या पाच दिवसीय विदर्भाच्या दौºयावर आहे. हा दौरा आंदोलनाची पूर्व तयारीचा एक भाग आहे. संघटनेच्या देशात ५ हजार शाखा असून श्रीलंका व लंडन येथेही शाखा आहेत. आरक्षणाची पहिली चळवळ २००५ पासून सुरू केली. सोलापूर विद्यापिठाचा शिवयोगी श्री सिद्धेश्वर असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. त्या अनुषंगाने आम्ही संबंधितांना निवेदनेही दिली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्याची घोषणा केली. सदर घोषणचे एक अपवाद वगळता कुठेही स्वागत झाले नाही;पण या घोषणेनंतर २४ ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. तर २० ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा दहन करून दिला नाही. शिवाय पाच ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज हा आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, राजकीय पोळी शेकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर विद्यापीठ असे नाव देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी येत्या १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असून राज्याचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य मागे घेत झालेल्या चुकीची दुरूस्ती करावी. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असेही यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अभय कल्लावार, उध्वराव गाडेकर, सुरेश पट्टेवार आदींची उपस्थिती होती.