शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पदयात्रेत धनंजय मुंडेच ठरले हिरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:26 IST

यवतमाळ जिल्ह्यातून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक काळ राहिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे दु:ख जाणले : भाजपाच्या आश्वासनाची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यवतमाळ जिल्ह्यातून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक काळ राहिली. या काळात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच भावलेत व तेच या यात्रेचे हिरो ठरले. या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व नागरिक यांच्याशी माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री तथा आ. जयंत पाटील आदींनी संवाद साधला. याप्रसंगी विदर्भातील कापूस सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना अगदी जवळून समजून घेता आल्या.यवतमाळ येथून सुरू झालेल्या या १५६ कि़मी.च्या हल्लाबोल पदयात्रेत ८५ कि़मी.चा प्रवास वर्धा जिल्ह्यातून झाला. या यात्रेत शिरपूर पासून सेलडोह पर्यंत यात्रेतील नेत्यांनी प्रत्येक गावशिवारात शेतकरी व शेतीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली कपाशी नेत्यांना दाखविली. शिवाय शेतीवर झालेल्या खर्चाची माहिती दिली. इतकेच नव्हे तर यंदा झालेले नुकसानही त्यांनी याप्रसंगी नेत्यांना सांगितले.धनंजय मुंडे यांचे ठिकठिकाणी झालेले आक्रमक भाषण लोकांना भावणारे ठरले. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंंडे यांच्या पठडीत तयार झालेले धनंजय मुंडे यांचे नेतृत्वच राष्ट्रवादीचा खरा लोकनेता आहे, अशी भावनाही या निमित्ताने पक्षाच्याच वर्तुळातून उमटली. या यात्रेदरम्यान जयंत पाटीलांनी सर्व काळ आपल्या खांद्यावर ठेवलेला राष्ट्रध्वज हाही अनेकांना भावला. या यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी शेतातच नेत्यांची झालेली जेवण व सर्वसामान्यांमध्ये मिसळणाºया महिला पदाधिकारी याही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. आता या साऱ्याघडामोडी सभागृहात ही नेतेमंडळी किती आक्रमकपणे मांडते, याकडे या भागातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे. पदयात्रेच्या माध्यमातून अधिवेशन संपता का होईना शेतकऱ्याच्या कापसाला बोनस जरी जाहीर झाला तरी हे या पदयात्रेचे यश असेल, अशी प्रतिक्रीया उमटली आहे.मंत्री बहिणीवरही डागली मुंडेनी तोफवर्धा येथील जाहीर सभेत धनंजय मुंडे यांचेच भाषण सर्वाधिक आक्रमक होते. त्यांनी आपल्या भाषणात क्लिन चिट तयार ठेवणारे मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. राज्याच्या ११ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांकडे सादर केले;पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिन चिट दिली. राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी भ्रष्टाचार तरी कशात करावा, तर लहान मुलांच्या चिक्कीत भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी विविध मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी केलेली टिका ही जाहीर सभेतील अनेकांना सरप्राईज देणारी होती. मुंडे यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार मंचावरच मनसोक्त हसत होते.शिवसेनेवरील थेट टीका टाळलीवर्धा जिल्ह्यातील ८० कि़मी.च्या संपूर्ण प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेस हल्लाबोल पदयात्रेत सहभागी नेत्यांनी शिवसेनेवर थेट टीका केली नाही. शिवसेनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकांना टिकेची अपेक्षा होती;पण धनंजय मुंडे यांनी रामनगरातील सर्कस मैदान येथील सभेत अकरा भ्रष्ट मंत्र्यांच्या यादीत आरोग्य व उद्योग मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा ओझरता उल्लेख केला. याशिवाय कुणीही फारसे शिवसेनेवर बोलताना दिसले नाही, हे उल्लेखनिय.