शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

केळझरचा विकास आराखडा तयार करावा

By admin | Updated: March 7, 2017 01:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले आहे.

शैलेश नवाल : आढावा बैठकीतील सूचनावर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले आहे. गावाच्या संपूर्ण विकासासाठी ग्रामविकास आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत केळझरच्या विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला आ. डॉ. पंकज भोयर, सेलूचे तहसीलदार रवींद्र होळी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक इलमे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे, केळझरचे सरपंच उपस्थित होते. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक वरदविनायक म्हणून केळझरच्या गणपतीची ओळख आहे. जागृत गणेश मंदिर व नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. जानेवारी पौष संकष्ट चर्तुर्थीला येथे एक दिवसाची यात्रा भरते. तसेच गणेशोत्सवादरम्यान विदर्भातील भाविक वरद विनायकाच्या दर्शनाला येत असतात. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करताना गणपती मंदिराच्या आसपासचा परिसर, पथदिवे, सोलर पॅनल, पाण्याची व्यवस्था आणि रस्ते यांचा समावेश करावा. दत्तकग्राम योजनेंतर्गत सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशा पद्धतीने इमारतीचे बांधकाम करून त्याला ग्रामभवन असे नाव द्यावे. पाणी पुरवठा योजना ही ४० वर्षे जुनी असून पाईपलाईनची दुरूस्ती तसेच आणखी ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीची व्यवस्था १४ व्या वित्त आयोगातून करावी. गणपती मंदिराला लागून असलेल्या तलावातील गाळ काढून त्यातून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. आ.डॉ. भोयर यांनी शहीद स्मारक ते बौद्धविहारपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून द्यावा. प्रस्ताव अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंजूर करून घेता येईल. केळझर येथे बस थांबा असून बऱ्याच बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे निर्दशनास आणून दिले. याबाबत एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रकांनी दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी दिल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)कामांचा दर्जा राखण्याचे निर्देशगावातील अंतर्गत रस्ते तयार करताना त्यामध्ये दुभाजक तयार करू नयेत. केळझरमध्ये होणाऱ्या विविध उत्सवासाठी एकच मोक्याची जागा निश्चित करून त्याच ठिकाणी सर्व उत्सव घेण्यात यावेत. केळझर येथे विविध ठिकाणी पुरातन मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी एक संग्रहालय तयार करून सर्व मूर्ती एकत्र ठेवून त्यांचे व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. पीर बाबा टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. केळझर हे ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्रात येत असल्याने पर्यटन विकास कामासाठी ३ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातून होणारी विकास कामे जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एनआयटीला नेमण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.