शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:36 IST

शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : साहूर येथील कामाची पाहणी

ऑनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ते साहूर येथे पांदण रस्त्याची पाहणी करायला आले असता शेतकऱ्यांशी बोलत होते.यावेळी तहसीलदार सीमा गजभिये, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, पंचायत समिती सदस्य ईश्वर वरकडे, छत्रपती वरकड, उत्तम घारे, पांडुरंग हिवरे, प्रसाद वरकड, प्रवीण टापरे, नितेश ढवळे, शिरीष लाड, राहुल टापरे, रवींद्र खंडार, धनराज खंडार, विठ्ठल टाकळकर, सूरज टापरे, तलाठी शिराळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या समस्याही जाणून घेतल्या.आष्टी तालुक्यात आगमन होताच जिल्हाधिकाºयांनी वनविभागाच्या परिसराची पाहणी करून वनाधिकारी अमोल चौधरी यांचे कौतुक केले. त्यानंतर वनविभागाने केलेल्या नाला खोलीकरण कामाची पाहणी केली. येथून साहूर येथील पांदण रस्त्याला भेट दिली. जेसीबी मशीन शासनाने उपलब्ध करून दिली आहे. लोकांच्या सहभागातून अल्प रकमेत मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.यानंतर महसूल विभागाच्या बांधकामाला भेटी दिल्या. यामध्ये निकृष्ठ व सुमार दर्जाच्या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाला एवढा निध दिला; मात्र कामाचा दर्जा नीट ठेवला नाही यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. सोबतच बांधकाम विभागाला तात्काळ बांधकामबाबत स्पष्टीकरण मागून कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तहसीलदार गजभिये यांना दिले. जिल्हाधिकारी नवाल यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. यावेळी नायब तहसीलदार रणजित देशमुख, अमोल कदम, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बाळस्कर उपस्थित होते.