वर्धा बाजार समितीतील प्रकार : विरोधाचे राजकारण होण्याची चर्चावर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाशी बंडखोरी करीत श्याम कार्लेकर यांनी सभापतिपद बळकावले. यातून अंतर्गत वाद उफाळल्याने त्यांच्यावर अविश्वास आला; मात्र तो बारगळला. अंतर्गत असलेल्या या वादाचा फटका समितीत होणाऱ्या विकास कामांना बसणार अशी चर्चा आहे. ज्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात वर केला होता ते सभातींकडून होत असलेल्या विकास कामांना हात देतील काय, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावाच्या वाऱ्याने वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जिल्ह्यात चर्चीली जात आहे. यात पहिले माजी सभापती शरद देशमुख व नंतर सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास आला. यातील देशमुख यांच्यावरील प्रस्ताव पारित झाला तर कार्लेकर यांच्यावरील प्रस्ताव बारगळला. यामुळे आता समितीत विकास कामे करण्याचे आव्हान सभापतींना आहे. अविश्वासाच्यावेळी एकत्रित आलेले सभासद समितीच्या सभापतीला विकास कामे करताना पाठींबा देतात की त्यांना विरोध करतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर देणे व त्यांच्याकरिता योग्य सुविधा बाजार समितीने द्याव्या अशी बळीराजचाची माफ अपेक्षा आहे. ही अपेक्षा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीतून पूर्ण होत असल्याने ती आज विदर्भात नावलौकीक मिळवून आहे. वर्धा बाजार समितीत आतापर्यंत एकाधिकारशाही असूनही तिचा पाहिजे तसा विकास झाला नाही. याच मुद्यावर एकत्र येत सर्वच सदस्यांनी शदर देशमुख यांच्यावर अविश्वास आणला होता. त्यावेळी कुणीच नेत्याच्या दडपणात गेले नाही. मग आता विकास कामे करताना आता या सदस्यांकडून होणारा विरोध सर्वांनाच बुचाकळ्यात पाडणारा आहे.(प्रतिनिधी) अंतर्गत वादातून आला होता अविश्वासजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बाजार समितीत विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. तो पारितही झाला. अशात पक्षनिष्ठेच्या कारणावरून पुन्हा अविश्वास आला. तो बारगळला. आता विकास कामांना चालना मिळेल, असे वाटत असताना होणाऱ्या कामांना विरोध होण्याचे चित्र समितीत निर्माण झाले होते. केवळ राजकारणाच्या खेळात वर्धा बाजार समितीचे चित्र पालटण्याऐवजी ते तसेच राहणार असल्याचे संकेत येथे दिसत आहे. विकास कामावरून एकत्र आलेल्या या संचालकांनी निदान विकास कामांना विरोध टाळावा, अशी अपेक्षा येथे येत असलेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अंतर्गत वादाचा विकास कामांना फटका
By admin | Updated: October 9, 2016 00:35 IST