शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकरात २० लाखांचे उत्पन्न घेण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:18 IST

एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले.

ठळक मुद्देउन्हाळ्यात केली सात हजार टिशू केळीच्या रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकीकडे केळीच्या बागा नावापुरत्याच दिसत असताना पवनार येथील एका युवकाने स्वेच्छानिवृत्ती घेत शेतीत पूर्णत: लक्ष दिले. भर उन्हाळ्यात त्याने पाच एकरात केळीची लागवड केली व अवघ्या दोन महिन्यांत त्यापासून उत्पन्नही मिळणार आहे. ५ लाख रुपयांचा खर्च करून २० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा बाळगणारा हा शेतकरी इतरांकरिता आदर्शच ठरणार आहे.ग्रामसेवकाची नोकरी करणाºया कुंदन वाघमारे यांनी डिसेंबर २०१५ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. पवनार-सुरगाव मार्गावर शेती घेऊन भर उन्हाळ्यात ६ मार्च रोजी पाच एकरात ७ हजार टिशू केळीच्या रोपांची लागवड केली. उन्हाळ्यात केळीची लागवड आपल्या भागात करणारा कदाचित हा पहिलाच शेतकरी असावा. ठिबक सिंचनाच्या साह्याने बैलजोडीचा वापर न करता शेती करण्याचा चंग बांधला. मार्च महिन्यात लागवड आणि आगस्ट महिन्यात फळधारणा झाली. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात केळी विक्रीस बाजारात जाण्यायोग्य झाली असून फेबु्रवारी महिन्यात संपूर्ण बगीचा खाली होण्याची शक्यता आहे. दीड वर्षाचे असलेले केळीचे पीक ११ महिन्यांत मिळणार आहे. एक हजार रुपये क्विंटल भाव धरल्यास सरासरी ३५ किलो याप्रमाणे प्रती केळीच्या झाडापासून ३५० रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. यामुळे पाच एकरातील केळीपासून ५ लाख रुपयांच्या खर्चात २२ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या केळीच्या बगीच्याला अधिकाºयांसह शेतकºयांनी भेटी दिल्या. हा प्रयोग यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. यामुळे येत्या काळात केळीच्या बागा वाढण्याची शक्यता आहे.कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येते. केळीच्या बागा नामशेष होत असताना एका वर्षात कमी खर्चात अधिक उत्पन्न केळीपासून घेता येऊ शकते, हे आता सिद्ध झाले आहे. शेतकºयांनी पुन्हा केळी पिकाकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.- कुंदन वाघमारे, शेतकरी, पवनार.