कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:22+5:30

राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ६४१ शेतकऱ्यांचा २३ लाख १२ हजार ७८८.५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर ३९ हजार ९०६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ७ लाख २१ हजार ३०७.०९ क्विंटल कापूस कापूस पणन महासंघ, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद कालपर्यंत घेण्यात आली आहे.

The Department of Agriculture miscalculated cotton production | कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला

कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला

googlenewsNext
ठळक मुद्देम्हणे, २५.६७ लाख क्विंटल उत्पादन होईल । खरेदी झाला ३०.३४ लाख क्विंटल कापूस

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अंदाजच चुकल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. इतकेच नव्हे तर या विषयावर कृषी तज्ज्ञांकडूनही दुजोरा दिला जात आहे. परिणामी, प्रत्यक्ष फिल्ड न करणाऱ्या आणि २५.६७ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचीच बदली करण्याची मागणी होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१९-२० या हंगामात वर्धा जिल्ह्यात २५.६७ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता कागदी घोडे धावविणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून वर्तविण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्ष फिल्ड न करणाऱ्या कृषी विभागाचा हा अंदाज सुमारे ३० टक्क्यांनी चुकल्याचे सध्या दिसून येत आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ६४१ शेतकऱ्यांचा २३ लाख १२ हजार ७८८.५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर ३९ हजार ९०६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ७ लाख २१ हजार ३०७.०९ क्विंटल कापूस कापूस पणन महासंघ, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद कालपर्यंत घेण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ६६ हजार ५४७ शेतकऱ्यांनी ३० लाख ३४ हजार ९५.६७ क्विंटल कापूस विकला असून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक असल्याचे वास्तव आहे. या संपूर्ण प्रकाराला केवळ कृषी विभागच दोषी असल्याचे बोलले जात आहे.

२८ हजार ९१० शेतकºयांचा कापूस खरेदी होणे शिल्लक
कापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघाकडे ७ हजार १४४ तर सीसीआयकडे ४२ हजार ९९० शेतकऱ्यांनी २७ मे अखेरपर्यंत नोंदणी केली. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अद्यापही खरेदी करण्यात आलेला नसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

पीक कापणी प्रयोगाच्या आधारे कुठल्या शेतमालाचे किती उत्पादन होईल याचा अंदोज कृषी विभाग वर्तवितो. वर्धा जिल्ह्यात कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज नेमका कुठे चुकला याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विचारल्या जाईल. शिवाय त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य कार्यावाही करण्यात येईल.
- आर. जे. भोसले, सहा. कृषी संचालक, नागपूर विभाग, नागपूर.

७५१ शेतकºयांनी केली दुबार नोंदणी
सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस देण्यासाठी एकूण ५० हजार ८८५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी झाल्यावही शेतकºयांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याची बाब उजेडात आल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत नोंदणी करणाºया ५० हजार ८८५ शेतकºयांपैकी ७५१ शेतकºयांनी दुबार नोंदणी केल्याचे पुढे आले आहे. परिणामी या नोंदणीला चाळणी लावून ती वगळण्यात आली आहे. शिवाय सदर मोहीम सध्या युद्धपातळीवर राबविली जात असून मोहीम पूर्णत्वास गेल्यावर दुबार नोंदणी करण्याच्या प्रकाराला मोठी चाळणीच लागणार असल्याचे बोलले जात आहे.

वर्धा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत सन २०१९-२० या हंगामात नक्कीच २५ टक्क्यांनी कपाशीचा पेरा वाढला. परंतु, त्याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. इतक्यावरच अधिकारी थांबले नाही तर त्यांनी कार्यालयात बसूनच कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज वर्तविल्याचे कापूस खरेदीच्या आकडेवारीवरून दिसून येते. हा प्रकार निंदनिय आहे. त्यामुळे अशा दुर्लक्षीत धोरण अवलंबणाºया अधिकाºयांना शासनानेही समज देत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

Web Title: The Department of Agriculture miscalculated cotton production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.