शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

देवळी व आर्वीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:24 IST

विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा

आॅनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. तर दुपारी देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव) तर आर्वी तालुक्यातील विरूळ, रसुलाबाद, रोहणा येथे गारपीट झाली. गारपीट वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले. तर वर्धा व खरांगणा परिसरात मुसळधार पाऊस आला.नाचणगाव येथे गारपीटांमुळे शेती पांढरी झाल्याचे दिसून येते आहे. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन आल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कालपर्यंत पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात असताना आज झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुरता अडवणीत सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास आलेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील उभा गहू झोपला. गारींच्या माऱ्याने चण्याच्या घाट्या फुटल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे अवकाळी पावसाचा या कापूस उत्पादकांनाही फटका बसला.आपटी परिसरात नागरिकांच्या घरासमोर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या भागात आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या गारपीटीमुळे रस्ते पांढरे झाले होते. तर पुलगावात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात २० हजार ४९९ हेक्टर वर गहू तर ४०,२३६ हेक्टरवर चणा पिकाची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सुचना प्राप्त होताच कृषी विभाग झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करण्यासाठी लागले आहे.४५८ गावांतील बत्ती झाली होती गुलया वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ फिडरवरील वीज पुरवठ्यात बिघाड आला होता. यामुळे जिल्ह्यातील ४५८ गावांतील बत्ती गुल झाली होती. यात विरूळ, पुलगावसह इतर भागातील बत्तीही गुल झाली होती. या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी सध्या २२ गावातील अडचण शोधण्याचे काम वीज वितरणकडून सुरू आहे. ही दुरूस्ती होण्याकरिता आणखी किती काळ लागेल, हे सांगणे कठीण आहे.माहिती घेण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या सूचनाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतांना बराच फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याकरिता सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. ही माहिती देण्यात देवळी तालुका पहिला ठरला असून येथे ५०५ हेक्टरमधील गहू तर ६३ हेक्टरमधील चणा पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.आणखी दोन दिवस धोकाजिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले साहित्य झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.