शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

‘व्यसनाला बदनाम करा’ मोहीम

By admin | Updated: January 3, 2015 23:08 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चला व्यसनाला बदनाम करू या ! ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा शाखेतर्फे ही मोहीम राबवून समारोपीय कार्यक्रम जय महाकाली शिक्षण

वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चला व्यसनाला बदनाम करू या ! ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा शाखेतर्फे ही मोहीम राबवून समारोपीय कार्यक्रम जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सभागृहात घेण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजकिशोर तुगनायत, प्रा. अमर भोयर, गजेंद्र सुरकार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरकार म्हणाले, व्यसन करणे आणि अंधश्रद्धा असणे या दोन्ही बाबी सारख्याच आहे. कारण दोन्ही वेळी माणूस आपला विवेक विसरतो. ज्या प्रमाणे अंधश्रद्धा आपला श्रम, वेळ, पैसा यांचा अपव्यय करते त्याचप्रमाणे व्यसन केल्यानेही श्रम, वेळ, पैसा यांचा अपव्यय होत असतो. व्यसन करताना व्यक्ती काहीही विचार न करता दारू, गांजा, ड्रग, तंबाखू, बिडी, सिगारेड व अन्य व्यसन करतो., तो त्याच्या आधीन झाला हे कळत असूनही त्यापासून तो दूर राहू शकत नाही. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारा माणूस किमान १८ लाख रुपयांपर्यंत तर दारू पिणारा ४८ लाखपर्यंत रुपये आपल्या संपूर्ण जीवनात खर्च करतो. कॅन्सर, लिव्हर खराब होणे, रक्तदाब, हृदयविकार असे अनेक दुर्धर आजार होतात. कुटुंब रस्त्यावर येते. खोटे बोलण्यापासून तर खून, बलात्कार, अपघात, घडतात. असे असतानाही व्यसनाला तरूणांमध्ये मध्ये प्रतिष्ठा लाभत आहे. सिगारेड, दारू पिणे हे मोठ्या व्यक्तीचे लक्षण समजल्या जात आहे. सरकारही दारू पिण्याचे धोरण राबवत आहे. त्यामुळे तरूण दारूडे होत असल्याचे सुरकआर म्हणाले. प्राचार्य राजकिशोर तुगनायत म्हणाले, ३१ डिसेंबर हा भारतीयांनी नवीन वर्ष साजरा करताना दारू पिऊन करावा ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे तरूणांनी ३१ डिसेंबर ऐवजी गुडीपाडवा साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक विशाल हुलके यांनी तर आभार दीपक बारापात्रे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)