शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:50 IST

स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आधार फाऊंडेशनचा माँ राणी कला महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.येथील आधार फाऊंडेशन व्दारा आयोजित माँ राणी कला महोत्सवात विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हेमंत गडकरी, उद्योजक शंकर गुल्हाने, महेश गुल्हाने, अशोक चांडक, राहुल शर्मा, दीपक मांडवकर, प्रमोद श्रीराव, देवा निखाडे, किशोर गुजरकर, माया उमाटे, मोना किंमतकर, आशिष आकरे, स्नेहा आकरे, सुधीर चाफले, अशोक वांदिले, आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना अनासपुरे म्हणाले की, समाजात आज सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होत आहे. समाजाचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद ठेवावा लागेल. समाजात आज चांगलं काम करणाºयांची संख्या अतिशय कमी आहे. अशा सर्व लोकांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय समाजाचं भलं होणार नाही.शेतात राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच पाहीजे. शेतकºयांमुळेच आज आपण जीवंत आहोत, त्यांनी जर शेती करणे सोडले तर आपल्या जवळ कितीही पैसा असू द्या, आपण जीवंत राहू शकणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखा, समाधानानं जगला पाहीजे याची काळजी समाजाने व शासनाने घेणे गरजेचे असल्याचेही अनासपूरे यांनी सांगितले.युवकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, हुंडा घेवू नका, कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चांगले संस्कार स्वत:च्या अंगी निर्माण करून देश सेवेसाठी आपण पुढे आले पाहीजे. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा समाजासाठी आपण काय करतो? याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विदर्भाविषयी ते म्हणाले की, विदर्भाची भूमी ही सुपीक आहे आणि त्यामुळेच इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा होवून गेल. असे सांगत या संताच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग त्यांनी विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी विहिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार निलेश गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाऊंडेशनच्या विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील विविध भागातून नागरिकांची मोठी गर्दी होती. आयोजन समित्यांनी उत्तम नियोजन केल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.समाजहितार्थ कार्याचा झाला गौरवपर्यावरण विषयासंदर्भातही अनासपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी झाडांचे महत्व विषद करताना झाड स्वत: काही न मागता समाजाला सतत ते काही न काही देत असतात, त्यामुळे आपणही समाजाला काही तरी दिलं पाहीजे अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान मान्यवराच्या हस्ते समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. त्यामध्ये पुरात बस मध्ये अडकलेल्या प्रवाश्यांचे जीव वाचविणाºया सातेफळ येथील ग्रामस्थांचा मकरंद अनासपुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी हेमंत गडकरी यांनीही मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे