लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात ईपीएस ९५ या संघटनेचे ६० लाख सभासद आहेत. जिल्ह्यात ईपीएस ९५ या संघटनेचे ३० सभासद आहेत. हे सर्व सभासद महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे; पण या कर्मचाऱ्यांना २०० ते २५०० रुपये, अशी पेन्शन दिली जाते. या अल्प सेवानिवृत्ती वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी बुधवारी भिख मांगो आंदोलन करीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.ईपीएस ९५ या संघटनेच्या सभासदांनी अल्प सेवानिवृत्ती वेतनावर जगणे असाह्य झाले. या कर्मचाऱ्यांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. राज्य व केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुर्वी दिल्ली येथे रामलीला मैदान ते संसद असा मोर्चा काढण्यात आला होता. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, असे नमूद केले आहे. निवेदन देताना अशोक जिराफे, सुरेशप्रसाद तिवारी, रमेश वंजारी, राम वखरे, निळकंठ पिसे, अशोक ढुमणे, सुरेश मातने, विनोद नालमवार, योगेंद्र सोनाये आदी उपस्थित होते.
ईपीएस ९५ या पेन्शनर संघटनेचे भिख मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:15 IST
देशात ईपीएस ९५ या संघटनेचे ६० लाख सभासद आहेत. जिल्ह्यात ईपीएस ९५ या संघटनेचे ३० सभासद आहेत. हे सर्व सभासद महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे; पण या कर्मचाऱ्यांना २०० ते २५०० रुपये, अशी पेन्शन दिली जाते.
ईपीएस ९५ या पेन्शनर संघटनेचे भिख मांगो आंदोलन
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी