शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खत वाढल्याने शेणखताला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे.

ठळक मुद्देएक ट्रॅाली पाच हजार रुपयाला

  विनोद घोडे    लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एकीकडे रासायनिक खतांचे भाव वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. पण,  रासायनिक खताच्या अतिरेकी व असंतुलीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय उत्पदीत मालाची, जमिनीची पोत खालावली असून मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकणातून शेतकऱ्यांसाठी शेणखत, सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे.कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत आहे. रासायनिक शेतीतील मालाला दरही कमी मिळतो पपईचे पीक ते जैविकपद्धतीने पिकवत असल्याने पपई पिकाला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. शेखणत शेतात तयार करून त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्पादीत मालाची प्रत सुधारून उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखत यासारखी सेंद्रीय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार  करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी किशाेर बन्नगरे यांनी सांगितले. 

रासायनिक खताचे विपरित परिणाम प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही अधिक उत्पादन कसे घेता येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्राव्ये नष्ट होत असून जमीन कडक येत आहे. यामुळे जमिनीची पत घसरत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे मानवाच्या आराेग्यासही हानीकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचतशेणखताच्या वापराने जमिनीची सुपिकता टिकुन राहते. आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे  उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्याने शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे. असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. 

रासायनिक आणि शेणखतांचे दर शेखणत ५ हजार रूपये प्रती ट्रॉली, तर रासायनिक खत, सर्वच खत प्रती ५० किलोची बॅग, युरीया २५५ रूपये, १०:२६:२६ -१३५० रूपये, डीएपी - १४५० रूपये, २०:२०:० - १०५० रूपये, १८:१८:१०- १०५० रूपये, सुपर फॉस्फेट -४५० रूपये बॅग अशी रासायनिक आणि शेणखताचे दर आहेत. 

टॅग्स :agricultureशेती