कर्मचाऱ्यांचे निवेदन : नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकारवर्धा : नाचणगाव येथील प्राथमिक केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. नाचणागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका वणिता गजाम व परिचर अरुण पंधरे हे कार्यरत होते. यावेळी गावातील काही युवकांनी रुग्णाला आणले. यावेळी गजाम यांनी सदर रुग्ण गंभीर असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात न्या, असा सल्ला दिला. यावरून युवकांनी हल्ला करून त्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात दोनही कर्मचारी जखमी झाले. या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, आरोग्य सेवा, कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्यावतीने केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाहीची मागणी
By admin | Updated: October 14, 2016 02:40 IST