शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यात 'एमआयडीसी'ची मागणी धूळखात; बेरोजगारांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:25 IST

Wardha : रिकाम्या हातांना काम मिळत नाही, येथे उद्योगधंद्यांचीही आहे वानवा

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सर्व दृष्टीने सुजलाम, सुफलाम असलेल्या सेलूला एमआयडीसी व्हावी ही बऱ्याच वर्षांची मागणी दुर्लक्षित आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने तो मानसिकदृष्ट्या दिव्यांग होत चालला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वच गोष्टींनी सेलू तालुका अग्रेसर असताना येथे एमआयडीसी का होत नाही, असा आक्रोश आता तरुण करू लागले आहेत. सेलू तालुक्यात बोरधरण आहे. एवढेच नव्हे तर सिंचनाच्या दृष्टीने सर्व गावात बऱ्यापैकी व्यवस्था आहे. 

नागपूर-तुळजापूर मार्ग व समृद्धी मार्ग लागूनच गेल्याने चांगल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. एवढेच नव्हे तर पाच-सहा किलोमीटरवर सुकळी रोड रेल्वे स्टेशन सुद्धा पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे सेलू-सुकळी मार्गावर एमआयडीसी होणार हे पूर्वीपासून चर्चेला गेले. मात्र कृतीत उतरले नाही. आता हा मार्ग हिंगणा, हिंगणी, घोराड, सेलू, मदनी, सोनेगाव असा महामार्गसुद्धा झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग व तुळजापूर महामार्गाच्या मध्ये मोठी शेतजमीन उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळाला तर एमआयडीसीसाठी जागेची व पाण्याची अडचण नाही. त्यामुळे सेलूतील बेरोजगार व व्यावसायिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमआयडीसीच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी तरुणांसह व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे.

तालुक्यात दर्जेदार केळी व कापसाची उपलब्धता...सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन असल्याने लांब धाग्याचा दर्जेदार कापूस पिकविला जातो. त्यामुळे येथील कापसाला मोठी मागणी असते. या भागात मोठ्या प्रमाणात जिनिंग प्रेसिंगचे उद्योग सुरू झाले आहेत. तसेच दर्जेदार केळीसाठी पूर्वीपासून तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळे केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग व कापसापासून तयार होणारा कापड प्रक्रिया उद्योग व इतरही उद्योग इथे निर्माण झाल्यास एमआयडीसी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर राहील, असा उद्योग क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

उच्च शिक्षितांची कमी नाही पण, रोजगाराचा प्रश्नतालुक्यात उच्च शिक्षितांची काही कमी नाही. परंतु एकही उद्योग नाही. संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक असे डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, प्राचार्य संपूर्ण विदर्भावर नव्हे तर महाराष्ट्रावर छाप पाडून आहे. उच्चशिक्षित वर्गाबरोबरच सर्वसामान्य मजूर, सुशिक्षित बेरोजगार यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कामाची अपेक्षा आहे. एमआयडीसी निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात उद्योग व रिकाम्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आहे.

पालकमंत्र्यांकडून अपेक्षासेलू तालुक्यात एमआयडीसी व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून असली तरी ती मागे पडली आहे. वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून डॉ. पंकज भोयर हे कृतिशील व्यक्तिमत्त्व लाभले आहे. त्यांच्या डोक्यात अनेक सकारात्मक कल्पना असतात आणि ते कृतीतही आणतात, त्याची प्रचिती अनेकांना येत आहे. लोकांनी त्यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. सध्या ते राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता त्यांच्याकडून उद्योजक व बेरोजगारांच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. त्यांनी मनावर घेतले तर एक मोठा प्रश्न ते मार्गी लावू शकतात. त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे व सेलूत एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा भावी उद्योजक व बेरोजगारांकडून व्यक्त केली जात आहे

टॅग्स :wardha-acवर्धा