शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत.

ठळक मुद्देकोरोना, लॉकडाऊनचा परिणाम : १० मेगावॅटने वीजभार कमी

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात विजेची मागणी निम्मी म्हणजे ४० टक्क्यांनी घटली आहे.कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. मार्च मध्यंतरी आणि अखेरच्या आठवड्यात तसेच ४ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात अधूनमधून गारवा निर्माण झाला. यामुळे आणि कोरोनाच्या धास्तीने प्रतिष्ठाने आणि घरोघरी कूलर, इतर वातानुकूलित यंत्रांचा होणारा वापर एप्रिल महिना सुरू होऊनदेखील बंद आहे. वर्धा शहरात ३४ हजार ४०० वीजग्राहकांची संख्या आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पिअर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता. यावेळी (८६७ अ‍ॅम्पिअर) १६.६७ इतका कमी भार आहे. त्यामुळे १० मेगावॅटचा भार या हंगामात कमी झाला आहे.कोरोना विषाणूला थंड वातावरण पोषक राहत असल्याची अफवा पसरल्याने मार्च महिन्यातच सुरू होणारे कुलर, वातानुकूलित यंत्र यंदा बंद आहे. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक वापर बंद आहे. शासकीय कार्यालये, उद्योगही ठप्प आहेत. घरगुती ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मार्च महिन्यात दोनवेळा जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणच्या मालमत्तेची यात मोठी हानी झाली. मात्र, राज्यात कोरोनाचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य सुरूच ठेवले. दरवर्षी उन्हाळ्यात प्रारंभीच विजेची मागणी वाढत असल्याने भार वाढतो. यंदा कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे विजेचा वापर कमी झाला, पर्यायाने गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मागणी घटली आहे.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, वीज महावितरण, वर्धा. 

टॅग्स :electricityवीज