शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पक्षीसप्ताह घोषित करण्यासाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 13:36 IST

वर्ध्याहून रेवदंडामार्गे मुंबई असा तब्बल साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षिमित्र सायकलस्वारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देसाडेआठशे किलोमीटर सायकलयात्रा करून मंत्रालयात दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याहून रेवदंडामार्गे मुंबई असा तब्बल साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षिमित्र सायकलस्वारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना निवेदन दिले. निवेदनातून ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह घोषित करण्याची मागणी केली आहे.रेवदंडा (अलिबाग) येथे नुकतेच ३३ वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानिमित्ताने पर्यावरणपूरक सायकल हे पक्षिमित्रांचे वाहन व्हावे, हा संदेश देण्याकरिता बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे सदस्य दीपक गुढेकर व दर्शन दुधाने यांनी ही सायकल यात्रा काढली होती. वर्ध्यापासून सुरू झालेली ही सायकल रॅली कारंजा लाड, मालेगाव, लोणार, औरंगाबाद, अहमदनगर, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, गागोदे, पेण, अलिबाग असे मार्गक्रमण करीत रेवदंड्याला संमेलनस्थळी दाखल झाली. यादरम्यान सायकल रॅलीत नाशिक येथून अशोक काळे, मुंबई येथून जे. पी. शेट्टी, अलिबाग येथून विनायक डुकरे व प्रशांत पवार सहभागी झाले होते. संमेलनस्थळी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे, माजी संमेलनाध्यक्ष किशोर रिठे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संमेलन संयोजक रूपाली मढवी यांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. संमेलनानंतर बहार नेचर फाऊंडेशनचे चार सायकलस्वार रेवदंडा, अलिबाग, रेवास असा प्रवास करीत मुंबईला मंत्रालयात पोहोचली. महाराष्ट्रातील पक्षिमित्र, पक्षिअभ्यासक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह साजरा करतात. शासनानेही याला मान्यता द्यावी व शासकीय स्तरावर हा कालावधी पक्षीसप्ताह म्हणून अधिकृतरित्या घोषित करावा. त्यामुळे पक्षी व त्यांचे अधिवास याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, अशी भूमिका या सायकलस्वारांनी प्रधान सचिवांपुढे मांडली. पक्षिमित्रांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले. बहारच्या या सायकलस्वारांचे अभिनंदन करून हा विषय कामकाजात घेण्याची ग्वाही प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली. यावेळी विधानभवन उपसचिव एन. आर. थिटे उपस्थित होते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य