शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखान्याचे सदोष बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:31 IST

नजिकच्या येळाकेळी येथे ५० लाख रुपये खर्चुन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या नियंत्रणाखाली सुरु असलेले हे बांधकाम दर्जाहीन असल्याने या बांधकामाची चौकशी करावी,.....

ठळक मुद्देगुण नियत्रकांमार्फत चौकशी करण्याची मागणी : विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : नजिकच्या येळाकेळी येथे ५० लाख रुपये खर्चुन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या नियंत्रणाखाली सुरु असलेले हे बांधकाम दर्जाहीन असल्याने या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच रवीशंकर वैरागडे यांनी विभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.येळाकेळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. सात-साडेसात हजार लोकसंख्येच्या या गावात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. शिवाय ३ ते ५ कि़मी च्या परिसरात ४ ते ५ गावे आहे. मात्र पशुवैद्यकीय दवाखाना नसल्याने पशुधन पालकांना खासगी सेवा देणाºया डॉक्टरवर अवलंबुन रहावे लागत होते. त्यामुळे सरपंच वैरागडे यांनी पाठपुरावा करुन पशु वैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावला.५० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलू अंतर्गत या इमारतीचे काम सुुर करण्यात आले. पण, सुरुवातीपासून कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याची ओरड गावकऱ्यांकडून करण्यात आली. कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्याकडे तक्रार केल्यावरही दुर्लक्ष करण्यात आले. येथील संरक्षण भिंती व इमारत बांधकामात तुटक्या व ठिसूळ विटाचा वापर केला. शिवाय सिमेंटचा नाममात्र वापर करुन माती मिश्रीत वाळू वापरण्यात आल्याने अल्पावधीतच संरक्षक भिंतीला तडे गेले. स्लॅबच्या बांधकामाचाही दर्जा असाच आहे. वारंवार तक्रारीकरुनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अधिकारी व कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या कामाची गुणनियंत्रकांकडून चौकशी करण्याची मागणी सरपंच वैरागडे यांनी केली.