शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासाठी देवळीची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:53 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेद्वारे केली जातेय जनजागृती : विभागीय स्तरावर १५ वे स्थान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आहे. स्पर्धेच्या अंतीम क्षणापर्यंत पहिल्या तीन क्रमांकापर्यंत उडी घेवून बक्षीसाचे मानकरी ठरण्याचा मानस स्थानिक न.प. प्रशासनाने बोलून दाखविली आहे. शिवाय स्वच्छ व सुंंदर देवळीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी लोकांना भेटून त्यांचेकडून मत जाणून घेणे सुरू आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात येणाऱ्या लोकांसोबत संपर्क साधून तसेच सर्वेक्षणअपॅद्वारे विचारलेली प्रश्नांची माहिती जाणून घेतली जात आहे. स्वच्छता व सामाजिक जाणीवेच्या जनजागृतीसाठी भिंती चित्रे स्पर्धा आयोजित करून शहरातील भितींना सुंदर स्वरूप देण्यात आले. सध्या या आकर्षक रंगविण्यात आलेल्या भिंती विविध विषयांवर नागरिकांना माहिती देत आहेत. एकूणच या भिंती बोलक्या झाल्या आहेत. न.प.च्यावतीने आयोजित भिती चित्र स्पर्धेत स्वच्छ शहर, हागणदारीमुक्त शहर, पाणी वाचवा मोहीम, हुंडाबळी, बेटी बचाव-बेटी पढाव आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक भिंती चित्रे काढली. शिवाय न.प.च्यावतीने स्वच्छतेबाबत विशेष प्रबोधनही करण्यात येत आहे. प्लास्टीक निर्मुलनाची मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांना सूविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरूस्ती, सुशोभिकरण तसेच प्रत्येक शौचालयाचे विद्युतीकरण व बोरवलद्वारे २४ तास पाण्याची व्यवस्था केली जात आहे. ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्यांची व्यवस्था केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वाटखेडा येथील क्षेपणभूमीवर सेग्रागेशन यत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून शहरातून निघालेल्या ओल्या कचºयावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जात आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेबाबतचे मुल्यांकन केले जाणार आहे. सर्वेक्षणानुसार सध्या ही न. प. विभागीयस्तरावर १५ व्या क्रमांकावर व जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विदर्भातील ‘क’ स्तरीय न.प.च्या स्पर्धेत देवळी न.प.चे स्थान अव्वल राहणार असल्याचे बोलले जात आहे. सन २०१५ च्या स्पर्धेत या शहराने १ कोटीच्या हागणदारीमुक्तचा राज्यस्तरीय पुरसर प्राप्त केला आहे. या पुरस्काराच्या राशीतून स्वच्छ सर्वेक्षणासाठी खर्च केला जात आहे. केंद्र सरकारच्या क्वॉलीटि कॉन्सील आॅफ इंडिया या समितीच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. समितीचे कोणत्याही क्षणी आगमण होणे अपेक्षित असल्यामुळे स्थानिक न.प. पदाधिकारी, मुख्याधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहे. एकूच या उपक्रमाच्या माध्यमातून देवळी शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.शासकीय समितीकडून शहराची पाहणीस्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या दोन सदस्यीय समितीकडून बुधवारी शहराची पाहणी करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या समिती सदस्यांनी न.प.च्या कार्यपद्धतीसह शहरातील स्वच्छतेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच आवश्यक कागदपत्रांचीही पाहणी केली. राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे व प्रादेशिक संचालक नगर प्रशासन सुधीर शंभरकर यांनी यावेळी न.प. प्रशासनाला काही आवश्यक सूचनाही केल्या. शिवाय त्यांनी आढळलेल्या त्रुट्या पूर्ण करण्याचेही सूचविले. २० दिवसानंतर सुधारीत आढावा घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र मदनकर व न. प. मुख्याधिकरी प्रशांत उरकुडे यांनी यावेळी न.प.च्याद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी नगरसेवक शोभा तडस, सुचिता बकाने, कल्पना ढोक, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, पवन महाजन, गौतम पोपटकर, चारूबाला हरडे, मनोज निवल आदी उपस्थित होते.