शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

दातृत्व ही मानवास मिळालेली अनमोल देणगी

By admin | Updated: February 7, 2015 23:30 IST

कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु

सुवीरसागर महाराज : श्रीमद ज्ञानामृत कथमालेचे दुसरे पुष्पपुलगाव : कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु पुसून त्यांच्या वेदना टिपण्यासाठी सत्कारणी लावणे ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. कारण दातृत्वगुण ही मानवास मिळालेली अनमोल देणगी होय असे मौलिक विचार मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी पुलगाव येथील श्रीमद् ज्ञानामृत कथामालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले.बुंदेलखंड येथील बरेठी या गावातील जयंतीमाता व शिवचंद या दाम्पत्यांचे पुत्र असणारे सुवीरसागर यांना दहा वर्षापूर्वी मुंबई येथे आचार्य सन्मती सागर महाराजांनी जैन धर्माची मुनीदीक्षा दिली. अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीरांचा ‘जिओ और जिने दो’ संदेश संपूर्ण जगभर पोहचविण्याचा संकल्प करून सर्वधर्मसमभाव, अहिंसा व शांती हे क्रांतीकारी विचार मुनीश्री आपल्या बोधामृत रसपानातून करीत आहे. यांच्या प्रवचनाला शहरातील सर्वत्र सामाजिक स्तरातून उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. ‘कर भला तो हो भला’ या विषयावर प्रवचनाचे द्वितीय पुष्प गुंफताना अकबर बिरबलाच्या एका कथेचा संदर्भ देवून दान व दातृत्वाबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले व बादशाहाच्या नवरत्न दरबारातील बिरबल हा जैन समाजाचा महामंत्री असल्याचे सांगितले. आजची बालके ही राष्ट्राचे भावी कर्णधार असून मुलांचे पालनपोषण करीत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार करणे पालकांचे कर्तव्य आहे. आई ही जगातील सर्वात अनमोल भेट असून प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतला आहे. आई हा आपला प्रथम गुरू असतो. देवालयातील परमेश्वराच्या चंदनापेक्षाही आईच्या पावलांची धूळ मस्तकी लावणारा अधिक भाग्यवान असतो. कुणाचेही चांगले होईल असेच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दररोज सायंकाळी ६.३० वाजता कथास्थळावर संदीप जैन याच्या संगीत आनंदयात्रेचा नागरिक लाभ घेत आहे. महाआरती शरदचंद्र अवथनकर, सुरेश हनमंते, शास्त्रभेट बदनोरे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)