शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात वाहून गेल्याने दोन वर्षाच्या युवराजचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:46 IST

गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला.

ठळक मुद्देतक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला नाही : गावकऱ्यांनी राबविली शोधमोहीम

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला. तो परतलाच नाही. याची माहिती तळेगाव पोलिसांना देवूनही साधी तक्रार दाखल केली नाही. यामुळे शेवटी गावकºयांनीच शोधमोहीम राबवून युवराजचा मृतदेह शोधून काढला. काल त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.युवराज चव्हाण (२) रा. शिरकुटणी हा आई शेतात कामाला गेल्यावर घरासमोर खेळत होता. त्याचे वडील मुके, आंधळे व बहिरे असल्याने युवराज सरळ कालव्याजवळ गेला. याचा अंदाज त्यांना आला नाही. सध्या कालव्याद्वारे सिंचनाचे पाणी सोडल्याने कालवे तुडूंब भरून आहे. येथे खेळता-खेळता त्याने पाण्यात डोकावून पाहिले. तोल जाताच पाण्याच पडला व सरळ कालव्याने वाहन गेला. गावातील काही नागरिकांनी याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. गावातील राजेंद्र पवार आणि सुरेश चव्हाण यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जमादाराने तक्रार दाखल न करता मी पाहतो म्हणत वेळ मारून नेली. रात्र झाली तरी बेपत्ता युवराजचा शोध लागला नाही.शेवटी गावकरी व नातलग कालव्याच्या दिशेने रात्रभर शोधात निघाले. रविवारी सकाळी आर्वी तालुक्यातील मांडला कालव्याच्या गेटजवळ युवराजचा मृतदेह आढळला. पाण्यात गटांगळ्या खात गेल्याने शरीरावर खूप जखमा झाल्या होत्या. यानंतरही पोलिसांना माहिती दिली. तरीपण कुणीही पंचनाम्याकरिता आले नाही. शेवटी शवविच्छेदन न करताच अंत्यंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शिरकुटणी गावात पोलिसांप्रती असंतोष पसरला आहे. मृत युवराजच्या आईने पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.युवराजच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. वास्तविक पाहता ठाण्यात तक्रार आली नाही. स्टेशन डायरी अंमलदार ठाण्यात कोणीच तक्रार द्यायला आले नाही, असे सांगत आहे. सत्यता शोधून कारवाईचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.- धर्मराज पटेल, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव