शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:37 IST

देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला.

ठळक मुद्दे देवळी-वर्धा मार्गावरील घटना : एक ग्रा.पं. सदस्य तर दुसरा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला. यात ग्रा.पं. सदस्य अक्षय नारायण बाळबुधे (२४) रा. पडेगाव याचा जागीच मृत्यू झाला तर अनिल महादेव कोकाटे (२३) रा. पडेगाव याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला.नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ९ वाजता अनिल कोकाटे व अक्षय बाळबुधे हे दोघेही वर्धा येथे कामावर जाण्याकरिता पडेगाव येथून दुचाकीने निघाले. दरम्यान, देवळी-वर्धा मार्गावर मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात नियंत्रण सुटल्याने दोघेही मागाहून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २४ एबी ७०३१ च्या चाकाखाली आले. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.दु:ख बाजूला सारून अनिलचे नेत्रदानअपघातात मुलाचा मृत्यू झाला यामुळे कोकाटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला; पण हे दु:ख बाजूला सारून कोकाटे कुटुंबाने धाडसी निर्णय घेत अनिलचे नेत्रदान केले. येथील उपसरपंच नरेंद्र पहाडे हे मागील दहा वर्षांपासून नेत्रदान चळवळ राबवित आहेत. आजपर्यंत पडेगाव येथील २२ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. हाच वारसा जपण्याकरिता कोकाटे कुटुंबाने धाडसी निर्णय घेत पहाडे यांच्या पुढाकाराला प्राधान्य दिले. आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) येथे नेत्रदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.कुटुंबाचा आधार गेलाअक्षय बाळबुधे हा वर्धा येथे डॉ. जोगे यांच्या दवाखान्यात कार्यरत होता. शिवाय तो पडेगाव ग्रामपंचायतचा सदस्य होता. अत्यंत गरीब तथा आदिवासी कुटुंबातील असताना त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिवाय अत्यंत सालस आणि होतकरू होता. कुटुंबातील तो कमविता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबच उघड्यावर आले. अनिल कोकाटे हा शिक्षण घेत शेतीचे काम करीत होता. दोन्ही युवकांच्या मृत्यूमुळे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोक व्याप्त आहे.

टॅग्स :Accidentअपघात