शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

उपचाराविना राहिलेल्या तरूणाचा २२ दिवसानंतर मृत्यू

By admin | Updated: February 25, 2016 02:08 IST

समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथील सुनील पुरूषोत्तम वहारे यास सार्वजनिक ठिकाणी दोघांनी अमानुषरित्या मारहाण केली.

अमानुष मारहाण : पोलीस अधीक्षकांना तक्रारवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथील सुनील पुरूषोत्तम वहारे यास सार्वजनिक ठिकाणी दोघांनी अमानुषरित्या मारहाण केली. या जखमी झालेल्या सुनीलचा पैशाअभावी उपचाराविनाच २२ दिवसानंतर मृत्यू झाला. याबाबतची तक्रार त्याच्या परिवारातील सदस्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असून सबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वहारे परिवाराने दिलेल्या तक्रारीनुसार सुनील हा भाजीपाला विकणे, आॅटोरिक्षा चालविणे व सायंकाळी पाण्याच्या बाटल्या विकून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. १ फेब्रुवारी रोजी पैशाच्या कारणातून नारायणपूर गावातीलच प्रशांत मधुकर छापेकर व पप्पू मधुकर छापेकर यांनी त्याच्यासोबत वाद घातला. शेंडे यांच्या घरासमोर हा वाद झाला. छापेकर बंधुंनी सुनीलला लाथाबुक्यांनी व लाकडी फळीने छातीवर, पोटावर, पाठीवर व गुप्तांगावर अमानुषरित्या मारहाण केली. तसेच त्याला उचलून रस्त्यावर आदळले. यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. यावेळी अनेकजण उपस्थित होते. पण कुणीही वाद सोडविण्याची हिंमत केली नाही. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांना छापेकर बंधुंनी वादात आले तर मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुनीलला वाचविण्याकरिता कोणीही धावले नाही. सुनीलची आई कालिंदा पुरूषोत्तम वहारे यांनी सुनीलला सोडवून घरी आणले. तेव्हापासून त्याची प्रकृती बिघडत गेली. पैशाअभावी त्याच्यावर उपचारही झाले नाही. छापेकर बंधुंच्या भीतीमुळे पोलिसांकडे तक्रार नोंदविली नाही, असेही तक्रारीत नमूद केले.सुनीलची प्रकृती जास्तच बिघडत गेल्यामुळे शुक्रवारी २२ फेब्रुवारीला त्याला हिंगणघाटच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला सेवाग्राम रूगणालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सुनीलला कुठलाही आजार नव्हता. मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला असून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी वहारे परिवाराने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पोलीस प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)