शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

लेक जळाली, विकृतीचे काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून वर्धेकर एकत्र यायला लागले होते. दुपारी बारावाजता येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील ठाकरे मार्केट मार्गे निर्मल बेकरी चौक, अंबिका चौक या मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा मोर्चा विसावला. मोर्चादरम्यान महिला व तरुणींनी तीव्र भाषेत निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा द्या, हैदराबादच्या धर्तीवर कायदा करा, वुई वॉन्ट जस्टीस, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

ठळक मुद्देवर्धेकरांचा संतप्त सवाल : हिंगणघाट येथील जळीतकांड, शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथे प्राध्यापिका तरुणीला दिवसाढवळ्या पेट्रोल टाकून जाळण्यात आले. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. आरोपीला कठोर शासन आणि महिला, तरुणींच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांसह सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरीक रस्त्यावर उतरले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून वर्धेकर एकत्र यायला लागले होते. दुपारी बारावाजता येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील ठाकरे मार्केट मार्गे निर्मल बेकरी चौक, अंबिका चौक या मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा मोर्चा विसावला. मोर्चादरम्यान महिला व तरुणींनी तीव्र भाषेत निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा द्या, हैदराबादच्या धर्तीवर कायदा करा, वुई वॉन्ट जस्टीस, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा दिल्या. मोर्चकराच्या या एकमुखी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. व्यावसायिकांनी सकाळपासून स्वयंस्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवली होती. अतिशय शिस्तबद्धतेने काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध शाळा महाविद्यालयाच्या तरुणी, विविध सामाजिक संघटनांच्या महिला, राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मोर्चेकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी मोर्चेकराना शपथ देण्यात आली. निवेदनातील मागण्यांचे वाचन प्रा. नूतन माळवी यांनी केले.या मोर्चात माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शरयु वांदिले, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अर्चना वानखेडे, माजी नगराध्यक्ष इद्रकुमार सराफ, रवी शेंडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, भाजपाचे नगरसेवक वरुण पाठक, पालिकेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, रवींद्र कोटंबकर, रामभाऊ सातव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, सुधीर गिºहे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे, तुषार देवढे, प्रदीप बजाज, प्रशांत कुत्तरमारे, शालिग्राम टिबडीवाल, गिरीश अग्निहोत्री, सचिन गहलोत, माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, अर्शी मलीक, दीपक चुटे, जुबेर शेख, जगदीश टावरी, बा.दे. हांडे, नगरसेवक प्रदीप जग्यासी, सुनीता तडस, विल्सन मोखाडे, निहाल पांडे, जि. प. सभापती मृणाल माटे, सदस्य उज्ज्वला देशमुख, अर्चना टोनपे, पं.स.सभापती महेश आगे, शेडगावचे सरपंच मुरलीधर चौधरी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत, भानखेड्याचे सरपंच विलास भालकर, सेलू काटे येथील सरपंच विजय तळवेकर, बोरगाव (मेघे) येथील माजी सरपंच योगिता देवढे, राजू धोटे, शीतल चौधरी, प्रा. उल्हास लोहकरे, वाल्मिक देवढे, महेश वरखेडे, सुनील कोल्हे, उमेश बाभूळकर, प्रफुल्ल वाणी, देवीदास देवढे, हरीश चौधरी, विवेक भालकर, नागपूरचे हरीश तळवेकर, विवेक देशमुख, सुनीता देशमुख, सुनील ढाले, अंतरा मेंढूले, करुणा शेंडे, जया सुकळकर, उज्ज्वला लोहकरे, वनिता सुकळकर, नीलिमा लांबट, सविता वाणी, मनिषा देशमुख, पूनम यादव, विनीत भालकर, प्रफुल्ल देशमुख, निखिल देशमुख, प्रवीण बाळसराफ, स्वप्नील लोणकर, गुरूदेव चौधरी, गजानन निवल, गजानन बुरांडे , शीतल चौधरी, प्रवीण चौधरी, विठ्ठल चौधरी, विवेक देशमुख, ईश्वर कोल्हे, अनिल देशमुख, हरिष तळवेकर, रागिनी शेंडे, अर्चना भोमले, सविता धोटे, विद्या निवल, संजय खातदेव, समीर पावडे, शारदा केने, अल्का देवढे यांच्यासह वर्धेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा-महाविद्यालयांसह विविध संघटनांचा सहभागवर्ध्यातील आक्रोश मोर्चात शहरातील विविध शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय द्या, तसेच पोलीस विरोधी घोषणा दिल्या. मोर्चात संत पैकाजी महाराज सेवा समिती, संत पैकाजी महिला सेवा समिती, वांढेकर कुणबी समाज संघटना, सेवानिवृत्त पोलीस संघ, कुणबी संघटना, ज्येष्ठ महिला कुणबी संघटना, नागपूर वांढेकर कुणबी समाज संघटना, खैरी कुणबी रण रागिनी बहूउद्देशीय संस्था, कुणबी युवा विदर्भ, ज्येष्ठ महिला संघटना, राष्ट्रीय लहुशक्ती संघटना, पार्वती नर्सिंग, आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अंगणवाडी सेविका, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, महिला पोलीस बॉईज असोसिएशन, जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस, माजी सैनिक संघटना, भाजपा महिला आघाडी, युवा सोशल फोरम, टेलीकॉम नगर महिला संघटना, कारला चौक महिला संघटना, सालोड महिला संघटना, भीम आर्मी संघटना, मराठा सेवा संघ, संत जगनाडे तेली समाज संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच केसरीमल विद्यालय, संत चावरा स्कूल, गोल्ड किड्स स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, जिजामाता साबने विद्यालय, लोक विद्यालय, कुंभलकर महाविद्यालय, वायगाव (नि) येथील अंगणवाडीच्या महिला, पार्वती नर्सिंग म्हसाळा आदींसह विविध शाळा, संघटनांतील पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.शाळा पाडली बंदहिंगणघाट येथील पेट्रोल हल्ल्याच्या निषेधात गुरूवारी शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील मार्गाने जात असताना महादेवपूरा परिसरातील शाळा सुरू असल्याचे दिसले. मोर्चातील काही आंदोलनकर्त्यांनी शाळेत जात शाळा बंद करण्यास लावली. तर काही शाळांनी सकाळपासून विद्यार्थ्यांना सुटी दिली होती.दिव्यांगांचाही मोर्चात सहभागशहरातून निघालेल्या या विराट आक्रोश मोर्चात शहरालगतच्या गावातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सेलडोह येथील रहिवासी रमेश तिवारी हे एका पायाने अपंग असतानाही ते कुबड्यांचा आधार घेत या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातून निघालेल्या या मोर्चात त्यांनी सहभागी होऊन समाजाप्रती असलेले कर्तव्य बजावले.पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निघाला आक्रोश मोर्चापेट्रोल हल्ल्याच्या निषेधार्थ वर्ध्यातील शिवाजी चौकातून सकाळी साडेअकरा वाजता पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सर्व दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात आली होती. यासाठी अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयुष जगताप यांच्या नेतृत्त्वात १२ पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, २१७ पोलीस कर्मचारी, ३८ महिला कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचे दोन पथक, दंगल नियंत्रण पथकाचा चोख बंदोबस्त होता. शहरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक वळती करण्यात आली होती. नागपूर मार्गाने शहरात येणारी वाहने कारागृह मार्गाने तर आर्वीकडून येणारी वाहतूक आर्वी नाका ते धुनिवाले मठ मार्गाने वळविण्यात आली होती.सूतगिरणी कामगारांनी पाळला बंदहिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेच्या शरिरावर माथेफिरूने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ सेवाग्राम एमआयडीसी परिसरातील इंदिरा सहकारी सूत गिरणीतील कामगारांनी गिरणीचे उत्पादन दोन तास बंद करून निषेध नोंदविला. आरोपी विकेशला फाशीची शिक्षा द्या, असी मागणी यावेळी बजरंग दल कामगार परिषद संघटनेचे हनुमान देवतळे, शंकर पारवे, संजय नवघरे, अरूण सायंकार, नरेश लोखंडे, प्रमोद पांडे, राजेंद्र माहूरे आदींसह कामगारांनी केली.आंबेडकर चौकात उसळला जनक्षोभगुरूवारी शिवाजी चौकातून जनआक्रोश मोर्चा निघाला. शहरालगतच्या अनेक गावातून तसेच हिंगणघाट येथूनही काही नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान सकाळपासूनच आंबेडकर चौक परिसरात महिलांची गर्दी होती. काही महिला जिल्हा परिषदेच्या मार्गालगत असलेल्या फूटपाथवर सकाळपासूनच बसून होत्या. या मोर्चात महाविद्यालयातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.आम्ही शपथ घेतो की...नारी सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या निदर्शनास आलेल्या कुठल्याही अन्याय, अत्याचार होणाºया घटनेकडे एक माणुसकी म्हणून बघत असताना डोळेझाक करणार नाही. कुठलीही अशी घटना आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही सुजाण नागरिक म्हणून तत्काळ पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला माहिती देऊ. प्रसंगी अटकाव घालण्याचा प्रयत्न करू. आमच्या घरीच संस्कारात सदोदित स्त्री सन्मान कायम राहील, याची दक्षता घेऊ. समाजात प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होईल, अशीच कृती करू... अशी शपथ समीक्षा विनोद हिवंज, जान्हवी प्रफुल्ल वाणी, रागिणी शेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी