वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी जनमंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, नजर अंदाज आणेवारी रद्द करून पुन्हा सोयाबीन उत्पादकांचे सर्वेक्षण करण्यात यावे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्त्व भास्कर इथापे यांनी केले असून यावेळी शिवाजी इथापे यांच्यासह शेतकरी महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
By admin | Updated: October 31, 2015 02:55 IST